dr umesh shaligram 
पुणे

भारतात बनलेली लस जगभरात जाईल व अनेकांचे प्राण वाचवेल

डॉ. उमेश शाळिग्राम, व्यवस्थापकीय संचालक, सीरम इन्स्टिट्यूट

कोव्हिशिल्ड लशीला आपत्कालीन मंजुरी (इमर्जन्सी ऑथराझेशन) मिळणे सर्वांसाठीच सुखावह बाब आहे. ऑक्सफर्डच्या या लशीची जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी व अनेक लोकांवर चाचणी करण्यात आली आहे, वेगवेगळ्या नियंत्रकांनी तिचे मूल्यांकन केले असून, तिची सुरक्षितता व परिणामकारता (इफिकसी) तपासली आहे.

ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका (कोव्हिशिल्ड) लशीच्या ब्रिटन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका (येथील एचआयव्ही पॉझिटिव्ह लोक) अमेरिका व जपानमधील लोकांवर मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्या असून, त्याच्या सुरक्षिततेचा व परिणामकारकतेचा डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याला विविध देशांच्या रेग्युलेटर्स, इन्स्टिट्यूशनल इथिकल कमिटी, डेटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्ड यांनी मान्यता दिली असल्याने ही लस देशवासियांसाठी अत्यंत सुरक्षित आहे. ही लस २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानाला साठवता येत असल्याने ती लोकांना देणेही खूप सोपे आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संपूर्ण भारताला ही लस मिळणार ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. यासाठी ‘सीरम’च्या परिवाराने घेतलेली मेहनत खूप मोठी आहे व त्यासाठी त्यांचे अभिनंदन. त्याचबरोबर कोरोनामुळे संपूर्ण देश एकत्र आला व पंतप्रधान मोठी यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या यंत्रणांनी एकमेकांत खूप चांगला समन्वय ठेवला. यामध्ये नियंत्रक, जैवतंत्रज्ञान विभाग, आयसीएमआर या सर्व यंत्रणांनी परिणामकारकपणे व वेगाने लशीसंदर्भातील सर्व गोष्टींचे मूल्यांकन केल्यामुळे सर्वांत लवकर व त्याचबरोबर प्रत्येक पायरी व्यवस्थित तपासून ही लस बाजारात येत आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ या धोरणालाही या लशीमुळे बळ मिळेल. 

‘सीरम’कडे ७.५ कोटी डोस तयार
भारतात बनलेली ही लस जगभरात जाईल व अनेकांचे प्राण वाचवेल. यातून कोरोनाच्या संसर्गाचे संकट कमी होण्यास मदत होईल, हे सर्वांत महत्त्वाचे आहे. हे सर्व सरकारी पातळीवर उत्तम समन्वय असल्याशिवाय शक्य झालेच नसते. यात ‘सीरम’ची दूरदृष्टी असलेली टीम व विशेषतः सायरस व आदर पूनावाला यांच्या प्रयत्नांचा खूप मोठा वाटा आहे. पूनावाला यांनी जोखीम पत्करली व कोव्हिशिल्ड हे तिचेच फळ आहे. ही लस आता भारतीयांसह अनेक देशांना अत्यंत कमी किमतीत मिळणार आहे, याचा ‘सीरम’ परिवाराला आनंद आहे. सध्या ‘सीरम’कडे ७.५ कोटी डोस तयार असून, या आठवडाभरात दहा कोटी डोस उपलब्ध होतील. महत्त्वाचे म्हणजे, जगात कोणात्याही देशाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात डोस उपलब्ध नाहीत व वेगाने केलेली ही लसनिर्मिती जगासाठी आदर्श उदाहरण ठरणार आहे. पुन्हा एकदा निर्णयप्रक्रियेतील सर्व यंत्रणांचे मनःपूर्वक आभार.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्ना ठरला बिग बॉस 19 चा विजेता, फरहाना भट्ट ठरली रनरअप

Mumbai: बीएमसीच्या प्रारूप मतदार यादीत मोठे बदल; चार वॉर्डमध्ये ५०% पेक्षा जास्त वाढ, तर २४ वॉर्डमध्ये घट

Khandala : सातारा-पुणे मार्गावर भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रकचालक फरार

रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक फिस्कटले! हुतात्मा, वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरला वेळेत, पण दक्षिणेकडे जाणाऱ्या ‘या’ गाड्या २ ते ३ तासांनी धावताहेत उशिराने

Nanded Drug Seizure : शिवणीत तुरीच्या ताशेत लपवलेला ‘गांजा’ उघड; पोलिसांची धाड, ₹1.60 लाखांचा मुद्देमाल जप्त!

SCROLL FOR NEXT