आळंदी - प्रदक्षिणा रस्त्यावर वाहत असलेले गटाराचे पाणी.
आळंदी - प्रदक्षिणा रस्त्यावर वाहत असलेले गटाराचे पाणी. 
पुणे

गटाराच्या पाण्यातून प्रदक्षिणा

सकाळवृत्तसेवा

आळंदी - गटाराची दुरुस्ती न केल्याने वारकऱ्यांना गटाराच्या पाण्यातूनच मंदिर प्रदक्षिणा करावी लागत आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून प्रदक्षिणा मार्गाचे काम सुरू आहे. हे काम संथगतीने करण्यात येत आहे. त्यातच या कामात पालिकेकडूनच अडचणी आणल्या जात असल्याचा आरोप होत आहे. रस्त्यावरील खड्डे व वारंवार वाहणारे गटाराचे पाणी यामुळे आळंदीकर आणि वारकरी त्रस्त झाले आहेत. 

देहूफाट्यावर गजानन महाराज गल्लीसमोर जलवाहिनी फुटल्याने पाणी वाहत आहे; परंतु त्याच्या दुरुस्तीकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाला सांगूनही अद्याप दुरुस्ती न झाल्याचे नगरसेविका प्रतिभा गोगावले यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. सारंग जोशी यांनी, वारंवार कळवूनही पालिका प्रशासन काम करीत नाही. नागरिकांनी पालिकेकडून होणारा त्रास किती काळ सहन करायचा? अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. 

आळंदी विकास मंचचे ज्ञानेश्वर कुऱ्हाडे यांनी, रस्ता रुंदीकरणाच्या विरोधात काही जण न्यायालयात गेले आहे. त्यांना त्रास देण्यासाठीच पालिका दुरुस्ती करण्यात टाळाटाळ करत आहे. 

कार्तिकी वारी पंधरा दिवसांवर आली आहे. शहरात जागोजागी कचरा दिसत आहे. अतिक्रमण, डेंगीची समस्या निर्माण झाली आहे. 

याबाबत पालिका प्रशासन आणि कारभारी सुस्त आहेत. नगरसेवकांचेही प्रशासन ऐकत नसल्याचे चित्र आहे. त्याचा त्रास वारकरी व नागरिकांना होत आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT