चऱ्होली - महापालिकेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र.
चऱ्होली - महापालिकेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र. 
पुणे

कासारवाडी, चिखलीत सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प

पीतांबर लोहार

पिंपरी - शहरासह हिंजवडी, चाकण व तळेगाव दाभाडे एमआयडीसीत रोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे पुनर्चक्रिकरण व पुनर्वापर प्रकल्प उभारण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार कासारवाडी व चिखलीत प्रकल्प प्रस्तावित असून सहा ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून रोज 312 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे.

भविष्यात पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन शाश्‍वत जलस्रोतनिर्मिती, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन व नियोजनपूर्ण वापर करण्यासंदर्भात राज्य सरकारने धोरण निश्‍चित केले आहे. त्यानुसार सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, पुनर्चक्रिकरण व पुनर्वापरासाठी महापालिकेने आराखडा तयार केला असून, त्यासाठी आयआयटी किंवा नॅशनल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (निरी) यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. प्रक्रियायुक्त पाणी नवीन बांधकामे, सर्व्हिस सेंटर, लॉंड्री दुकाने, कुलिंग टॉवर, हाउसिंग सोसायट्या, उद्याने, क्रीडांगणे, स्वच्छतागृहे आदी ठिकाणी वापरण्यात येणार आहे. सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प राज्य व केंद्र सरकारच्या मदतीने किंवा पीपीपी माध्यमातून उभारण्याच्या प्रस्तावास महापालिका विधी समितीने मंजुरी देऊन सर्वसाधारणकडे पाठविला आहे. प्रकल्प उभारण्यासाठी शहर परिसराची पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी, चिंचवड एमआयडीसी; चिखली, निगडी, प्राधिकरण, तळेगाव एमआयडीसी आणि चाकण एमआयडीसी अशी चार भागांत विभागणी केली आहे.

प्रकल्पाचा पहिला टप्पा
- कासारवाडीत प्रतिदिन 75 दशलक्ष लिटर क्षमतेचे प्रक्रिया केंद्र व पंपिंग स्टेशन उभारणे
- कासारवाडीतून पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी एमआयडीसीसाठी पाणीपुरवठा करणे
- चिखलीत प्रतिदिन पाच दशलक्ष क्षमतेचे केंद्र उभारणे
- प्रक्रियायुक्त पाणी वितरणासाठी पहिल्या टप्प्यात 607 किलोमीटर लांब जलवाहिन्या टाकणे
- शहरात प्रतिदिन 120 दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी वापर शक्‍य
- हिंजवडी, चाकण, तळेगाव एमआयडीसी क्षेत्राला प्रतिदिन प्रत्येकी एक दशलक्ष लिटर
- चऱ्होली मैलाशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केलेले पाणी त्या भागातील नवीन बांधकामे व पिण्याव्यतिरिक्त वापरासाठी करणे
- प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 400 कोटी रुपये
- महापालिकेतर्फे 40 टक्के खर्च कंत्राटदारास टप्प्याटप्प्याने देणार
- 60 टक्के खर्चाची रक्कम सात वर्षांत त्रैमासिक पद्धतीने दिली जाणार
- प्रकल्प उभारणीचा कालावधी 2 वर्षे व देखभाल दुरुस्ती कालावधी 20 वर्षे

प्रक्रियायुक्त पाणी जलकुंभ क्षमता
कासारवाडी : 5 दशलक्ष लिटर
एमआयडीसी : 1 दशलक्ष लिटर
वाकड, पिंपळे सौदागर : 2 दशलक्ष लिटर
हिंजवडी फेज 1 : 0.7 दशलक्ष लिटर
हिंजवडी फेज 2 : 0.55 दशलक्ष लिटर क्षमतेचे दोन
हिंजवडी फेज 3 : 1.9 दशलक्ष लिटर क्षमता

महापालिका क्षेत्रातील पाणीस्थिती
प्रतिदिन पाणीपुरवठा : 520 दशलक्ष लिटर
प्रतिदिन सांडपाणीनिर्मिती : 312 दशलक्ष लिटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT