Stone
Stone 
पुणे

दगडांनाही ‘तो’ करतोय बोलतं!

समाधान काटे

गोखलेनगर - शाळेत असताना पुस्तकांतील चित्र बघून ती खापराच्या पाटीवर रेखाटण्याच्या केविलवाण्या प्रयत्नातूनच त्याचा चित्रकलेचा अभ्यास सुरू झाला. पाटीपासून सुरू झालेला हा चित्रप्रवास पुढे वही, कोरे कागद, कॅनव्हास, भिंतीवरून आता थेट दगडांवर येऊन पोचलाय. आपल्या जादुई कुंचल्यानं तो डोंगर-वनातील दगडगोट्यांनाही बोलतं करतोय... 

हा अवलिया चित्रकार आहे अमोल खरात. तो मूळचा नगरचा. सध्या गोखलेनगर येथील वनविभागाच्या भिंतीवर तो चित्रे रेखाटत असून, त्याची चित्रे सगळ्यांचे लक्ष वेधून घेताहेत. लहानपणापासून चित्रकलेचा छंद जडलेल्या अमोलने बारावीनंतर नाशिक येथील केटीएचएम ललित कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे चित्रकलेचे धडे घेतल्यानंतर त्याने खऱ्या अर्थाने आपली चित्रकलेची वही लोकांसाठी खुली केली. शाळा, हॉटेल्स, हॉस्पिटलच्या इमारतींच्या भिंतींवर चित्रे रेखाटण्यासाठी त्याला मागणी होऊ लागली. मात्र, भिंतींवर चित्र रेखाटताना त्याचं मन भिंत तोडू बघत होतं.

त्यातूनच त्याने ओबड धोबड दगडांना आपला कॅनव्हास बनवलं. दगडांत प्राणी-पक्ष्यांचे आकार शोधून त्यात रंग भरण्याचे काम अमोलने सुरू केले. डोंगर-जंगलातील दगडगोट्यांमध्ये रंग भरताना ‘सेव्ह ॲनिमल’, ‘सेव्ह वॉटर’, ‘सेव्ह जंगल’, ‘सेव्ह नेचर’, ‘सेव्ह अर्थ’ असे संदेशही तो देऊ लागला.  

अमोलने ‘दगडांवर चित्र’ हा प्रयोग पहिल्यांदा आदर्श गाव हिवरे बाजार येथे केला. तेथील ओसाड डोंगरावर गावकऱ्यांनी जिद्दीने उभ्या केलेल्या जंगलातील दगडांवर त्याने चित्रे रेखाटली. जंगलातील शांतता आणि पाखरांची गाणी ऐकत चित्रे काढण्याचा अनुभव काही औरच होता, असं अमोल सांगतो. विशेष म्हणजे पर्यावरणप्रेमींसाठी आता हा डोंगर पर्यटनस्थळ बनले आहे. 

‘रॉक पेंटिंग’मुळे अमोलची ‘रॉक आर्टिस्ट’ म्हणून ओळख वाढत आहे. सर्वसामान्यांसह राजकीय नेते, मंत्री, साहित्यिक, बॉलिवूडमधील तारे-तारकांनी दगडांवरील नावीन्यपूर्ण चित्रांचा प्रयोग पाहून त्याच्या कलेचं भरभरून कौतुक केलं. ‘‘अजून खूप दगड आणि भिंती रंगवायच्या आहेत. समाजाला चित्रांतून संदेश द्यायचा आहे,’’ असं अमोल म्हणतोय.

आम्ही अमोलला जंगलात रंगरंगोटी करण्याचे काम दिले होते. त्याचा हिवरे बाजारचा हा पहिला प्रयोग होता. छान पद्धतीने त्याने काम केले. त्यामुळे आमच्या डोंगराला शोभा आली. 
- पोपटराव पवार, सरपंच, हिवरे बाजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT