Bridging System Sakal
पुणे

डीआरडीओची ‘ब्रिजिंग सिस्टिम’ सैन्यात दाखल

भौगोलिक अडथळ्यांना जलदगतीने पार करण्यासाठी आणि भारतीय सैन्याची चपळता वृद्धिंगत करणाऱ्या ‘ब्रिजिंग सिस्टिमचा सैन्यदलात समावेश झाला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - देशाच्या पश्‍चिमी सीमेवरील नद्या तसेच देशातील विविध सीमाभागातील असलेल्या भौगोलिक अडथळ्यांना जलदगतीने पार करण्यासाठी आणि भारतीय सैन्याची (Indian Army) चपळता वृद्धिंगत करणाऱ्या ‘ब्रिजिंग सिस्टिमचा (Bridging System) सैन्यदलात (Army) समावेश झाला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) (DRDO) विकसित केलेल्या ‘शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टिम (एसएसबीएस)- १० मीटर’ या प्रणालीला सैन्यदलात शुक्रवारी दाखल करण्यात आले. दिल्लीच्या परेड ग्राऊंडमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात लष्कर प्रमुख जनरल एम.एम नरवणे यांच्या उपस्थितीत पहिल्या खेपेतील १२ पूल सैन्यदलाला मिळाले. (DRDO Bridging System Enter in Army)

डीआरडीओच्या पुण्यातील अभियांत्रिकी प्रयोगशाळेतील ‘संशोधन व विकास आस्थापना’ (आर अँड डी ई) (इंजिनिअर्स) यांनी एल अ‍ॅण्ड टी लि. यांच्या सहकाऱ्याने या प्रणालीची रचना व विकास केला आहे. या कार्यक्रमाला डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी, पुण्यातील प्रयोगशाळेचे संचालक प्रदीप कुरुलकर आदी उपस्थित होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय सैन्यदल व उद्योग क्षेत्राचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, ‘या प्रेरणेमुळे वेगाने वाढणाऱ्या भारतीय संरक्षण औद्योगिक परिसंस्थेला चालना मिळेल आणि उद्योगाला ‘आत्मनिर्भर भारत’ साठी योगदान देण्यात मदत होईल.’

यापूर्वी डीआरडीओने विकसित केलेले मॅन्युअली लॉन्च ३४.५ मीटरचे ‘माउंटन फूट’ ब्रिज सैन्याच्या वापरात आहे.

एसएसबीएस- १० मीटरचे वैशिष्ट्य

- हे १० मीटर लांबीचा व ४ मीटर रुंदीचा रस्ता तयार करून सैन्याचे वेगवान हालचाली सुनिश्चित करते

- ‘टाट्रा’ या वाहनाचा ब्रिजिंग सिस्टिमसाठी वापर

- ‘सिंगल स्पॅन ५ मीटर’ आणि दहा मीटर ‘शॉर्ट स्पॅन’ ब्रिजींग सिस्टिम तयार करता येते

- ४६ मीटरचा मॉड्युलर ब्रिज, २० मीटरचा ‘बीएलटी-टी 72’ ब्रिज, आणि ‘मल्टी स्पॅन’ हा ७५ मीटरचा सर्वत्र ब्रिजिंग सिस्टिमचा समावेश

‘सैन्याच्या अतिशय कठीण चाचण्यांमधून आणि कोरोनाच्या निर्बंधात ही आम्ही वेळेवर ही ब्रिजिंग सिस्टिम सैन्याला हस्तांतरीत केली. पाकिस्तानच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात कालव्यांची निर्मित करण्यात आली आहे. अशा वेळी रनगाडे आणि इतर सामान जलद गतीने हलविण्यासाठी याचा उपयोग होईल.’

- डॉ. प्रदीप कुरुलकर, संचालक - आर अँड डी ई (इ), पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Firing Incident : पुण्यातील वारजे भागात थरार! सलूनमध्ये केस कापत असतानाच गोळीबार; साहिल राऊतला जागीच ठोकल्या बेड्या, पाच जणांची पटली ओळख

Kolhapur IT Park : कोल्हापुरातील आयटी पार्कला गती, रोडमॅपसाठी पालकमंत्र्यांची मागणी; आयटी पार्कला ताराराणींचे नाव देण्याचा विचार

लढून थकलो, राजपाट सांभाळा; शिवरायांनी रामदास स्वामींना केलेली विनंती, बागेश्वरबाबांचं वादग्रस्त विधान

Sangli : तलावाच्या काठावर बसलेल्या मित्राचा तोल गेल्यावर वाचवण्यासाठी उडी घेतली अन् दोघेही बुडाले, पोलिस व आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणा...

Pune News: बिल्डरविरोधात नगरसेवक आक्रमक; गृहप्रकल्पांना पाणी पुरवठा करत नसल्याने कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT