लोणी काळभोर (पुणे) : एखाद्या व्यक्तीला आपल्या जवळच्या कॅफेमध्ये बसून दुसर्या शहरातील, राज्यातील किंवा अगदी एखाद्या देशातील मित्र आणि कुटुंबासह कॉफी किंवा जेवणही घेता येईल...हो अगदी असे होऊ शकते...त्यासाठी होलोग्राफिक डिव्हाइसचा वापर करून एक डिझाईन तयार केले आहे. तेही एका भारतीय मुलीने. विशेष म्हणजे तिच्या या डिझाईनला जगात सहावा क्रमांक मिळाला आहे.
"द वाईल्ड" या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या वतीने जगभरीतील डिझाईन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी "व्हर्चूअल रिऍलिटी अँड ऑगमेंटेड रिऍलिटी" या विषयावर नुकतीच आंतरराष्ट्रीय ऑनलाईन डिझाईन स्पर्धा घेतली होती. यात लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी एडीटी विद्यापीठाची विद्यार्थिनी श्रेया बन्सल हिने बनवलेल्या ''इंटर कनेक्टेड कॅफे'' या विषयावर बनविलेल्या डिझाईनला सहावा क्रमांक मिळाला आहे. या स्पर्धेत जगभरातून सुमारे दहा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकही भारतीय वंशाच्या अमेरिकेतील पर्सेन स्कूल ऑफ डिझाईन या संस्थेच्या आकाश चौधरी याच्या डिझाईनने पटकावला आहे.
श्रेया ही लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमध्ये इमर्सिव मीडिया डिझाइन या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. तिचे एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. मंगेश कराड, एमआयटी मिटकॉमच्या संचालिका प्रा. सुनीता कराड, विद्यापीठाचे कुलसचिव शिवशरण माळी, एमआयटी इन्स्टिटियूट ऑफ डिझाईनचे अधिष्ठाता डॉ. अनंत चक्रदेव आणि प्रा. ललित कुमार यांनी अभिनंदन केले आहे.
या डिझाईनबाबत श्रेया बन्सल हिने सांगितले की, ''इंटर कनेक्टेड कॅफे'' या डिझाइनमुळे एखाद्या व्यक्तीला आपल्या जवळच्या कॅफेमध्ये बसून दुसर्या शहर, राज्य किंवा अगदी एखाद्या देशातील मित्र आणि कुटूंबासह कॉफी किंवा जेवणही घेता येईल. या डिझाईनमध्ये प्रत्येक टेबलवर होलोग्राफिक डिव्हाइस लावण्यात आलेले आहे. या डिव्हाइसचा उपयोग करून ग्राहकांना मेनू पाहूण जेवणाची ऑर्डर, बिल भरणा, व्हिडीओ कॉल, नवीन लोकांशी संपर्क, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सहभाग आणि थेट संगीतही ऐकू शकता येणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत एक संपूर्ण नवीन कार्य संस्कृती विकसित करता येईल. अशा प्रकारच्या कॅफेचा उपयोग व्यवसाय मिटिंग, ग्राहकांचे पुनरावलोकन, मुलाखती आणि बर्याच गोष्टींसाठी केला जाईल.
या स्पर्धेतील पहिले सहा क्रमांकाचे विजेते अनुक्रमे पुढील प्रमाणे, कंसात विद्यापीठाचे व देशाचे नाव : आकाश चौधरी (पर्सेन स्कूल ऑफ डिझाईन, न्युयार्क, अमेरिका), निकोलस पेरूक्सी (लॉरेन्स टेक विद्यापीठ, अमेरिका), सॅम्युल हिग्गवे (कॅलिफोरनिया कॉलेज ऑफ आर्ट, अमेरिका), श्रीनिधी कृष्णन (
एरिझोना स्टेट विद्यापीठ, अमेरिका), आडम सेल्ह
युसी (बारकेली, कॅलिफोरनिया), श्रेया बन्सल (एमआयटी एडीटी विद्यापीठ, भारत).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.