पुणे

पिंपरी : पीएमपी चालक आणि एसटीच्या वाहकाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपळे गुरव येथे पीएमपी बसच्या चालकाला; तर पिंपरी येथे एसटी बसच्या वाहकाला मारहाण केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. याप्रकरणी मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

गणेश लक्ष्मण वाळुंज (वय 31, रा. राजगुरुनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. वाळुंज पीएमपीच्या भोसरी आगारात चालक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी (ता. 30) रात्री भोसरी ते हिंजवडी फेज तीन या मार्गावरील बस घेऊन जात होते.

पिंपळे गुरव येथील कल्पतरू चौकातील सिग्नलवर बस थांबली असताना एमएच 14, एफएम 0361 या क्रमांकाच्या मोटारीतून आलेल्या आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण केली. 

दुसरी घटना वल्लभनगर येथील एसटी आगारात घडली. याप्रकरणी एसटी वाहक हरिधर गंगाराम जाधव (वय 54, रा. मु. महागाव, पो. पवनानगर) यांनी फिर्याद दिली. रविवारी (ता. 29) सायंकाळी ते वल्लभनगर आगारात असताना तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना मारहाण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold and Silver Rates: १० दिवसांत सोन्याच्या दरात १३,४९४ ची घसरण, चांदीही स्वस्त झाली, खरेदीसाठी ही योग्य वेळ?

Latest Marathi News Live Update : गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार- चंद्रशेखर बावनकुळे

Amit Shah: पश्चिम बंगाल निवडणूक देशाच्या सुरक्षेशी निगडित: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ‘तृणमूल’ सरकारविरोधात भाजपचे ‘आरोपपत्र’ जाहीर!

No Kings Protest USA : इराण युद्धावरून अमेरिकेत संताप; ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात ९० लाख लोक रस्त्यावर उतरले

IPL 2026:'मला मजा आली...' इशान किशन RCB विरूद्धच्या पराभवानंतर काय बालून गेला? विराट कोहलीबद्दलही म्हणाला...

SCROLL FOR NEXT