driver seriously injured in Accident of tanker carrying petrol at Pune 
पुणे

पुण्यात पेट्रोल घेऊन जाणारा टँकरचा अपघात, चालक गंभीर जखमी

सकाळवृत्तसेवा

पुणे : पेट्रोल व डिझेल भरुन पुण्यात येणारा टँकर सोमवारी मध्यरात्री रामटेकडी येथे पलटी झाला. या अपघातात टँकरचालक गंभीर जखमी झाला असून त्यास अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढत रुग्णालयात हलविले. सुदैवाने टँकरमधील पेट्रोल व डिझेलची गळती झाली नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अण्णा मोटे असे जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे.हडपसर अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, मोटे हे त्यांच्या ताब्यातील टँकर हा लोणीकंद येथून रामटेकडीमार्गे पुण्यात घेऊन येत होता. सोमवारी मध्यरात्री एक वाजता टँकरचा रामटेकडी येथे अपघात झाला. या अपघातात टँकरचा पुढचा भाग पूर्णपणे तुटला. त्यामध्ये चालक गंभीर जखमी झाल्याने त्यास बाहेर पडता येत नव्हते. नागरीकांनी अग्निशामक दलास याबाबत खबर दिली. त्यानंतर काही वेळातच दलाचे जवान व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने चालकास बाहेर काढले. त्यानंतर त्यास उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात पाठविले.

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुक होणार ढोल-ताशाविना

दरम्यान, टँकरमध्ये 20 हजार लीटर डिझेल व 5 हजार लीटर पेट्रोल होते. अपघातात टँकरच्या पुढील भागाचे नुकसान झाले, सुदैवाने टाकीकडील भाग सुरक्षित राहिल्याने मोठी दुर्घटना टळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC: एसटीला दिलासा! दरवर्षी २४१ कोटींची बचत होणार, उत्पन्न वाढीसाठी परिवहनमंत्र्यांचा मोठा निर्णय

Pune समलैंगिक संबंधांना विरोध, २१ महिन्यात २ अल्पवयीनांची हत्या; २२ वर्षीय तरुणाला अटक

"प्लीज मला माझ्या लग्नाला बोलवा" व्हायरल खोट्या बातमीवर भाऊ कदमच्या लेकीची मजेशीर कानउघाडणी

Mumbai News: धारावी स्कायवॉकसाठी म्हाडाला फोडणी, पालिकेला ७५ लाख द्यावे लागणार; कारण काय?

Summer Office Wear Secret! फक्त ‘या’ टिप्सने मिळवा कूल आणि स्टायलिश प्रोफेशनल लुक

SCROLL FOR NEXT