Uruli_Devachi_Road 
पुणे

खड्डे आणि चिखलमय रस्त्यामुळे उरुळीकर त्रस्‍त; जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास

सकाळ वृत्तसेवा

उरुळी देवाची (पुणे) : हडपसर-सासवड पालखी मार्ग राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाल्यापासून या रस्त्याकडे जिल्हा परिषद, पुणे मनपा आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी मृत्युचा सापळा ठरत आहे. पाणी साठून राहिल्याने भेकराईनगर ते उरुळी देवाची फाटा या परिसरात चिखलाचा राडा, रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, पावसाचे साठलेले पाणी याचा त्रास पादचारी आणि वाहनचालक यांना होत असल्याने आपण खरोखरच पुणे मनपा हद्दीतूनच प्रवास करतो का? असा प्रश्न निर्माण होतो.

लॉकडाउनच्या काळात वर्दळ नसल्याने त्याची तीव्रता जाणवली नाही, पण अनलॉकनंतर वाहतूक वाढली असून चिखल आणि खड्ड्यांमुळे वाहतूक कासवगतीने पुढे सरकत असल्याने वाहतूक कोंडी होते. व्यावसायिकांनी स्वत:च्या खर्चाने मुरूम टाकून दुकानाच्या बाजूला चढ केल्याने सर्व पाणी रस्त्यावर येते. तेथून पाणी वाहून जाण्यास उतार नसल्याने सर्वत्र पाणी साठून राहते. अवजड वाहनाच्या सततच्या वाहतुकीमुळे त्याचे चिखलात रुपांतर होत असून रस्त्यालगतचा संपूर्ण परिसर चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. याबाबत राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

साठून राहिलेल्या पाण्यामुळे रस्त्यावर आणि कडेला मोठमोठे खड्डे पडले असून खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. खड्ड‍यातील पाण्यात वाहने आदळून अनेक वाहनांचे नुकसान होत असून त्याचा दुरुस्तीचा नाहक खर्च वाहन मालकांना सोसावा लागतो. पाणी साठून राहिल्याने आणि खड्ड्‍यांमुळे अनेक दुचाकी वाहनचालक घसरून पडण्याचे प्रमाण वाढले असून जीवघेणे अपघात होत आहेत. यासाठी परिसरातील रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी गेली काही वर्षे येथील स्थानिक नागरिक करत आहेत. 

चिखल आणि खड्ड्यांमुळे रस्त्यावर वाहन चालविणे अवघड झाले आहे. तसेच खड्डे, चिखल आणि साठलेल्या पाण्यातून रात्री प्रवास करण्यास सतत धाकधूक वाटते.
- सोमनाथ यादव, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस नेते, हवेली तालुका

गेली अनेक वर्षे रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरणाची मागणी करूनही त्याची दखल न घेतल्याने उरुळीकरांना पावसाळ्यात चिखल आणि खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतो.
- चैतन्य बनकर, सामाजिक कार्यकर्ते, उरुळी देवाची.

लॉकडाउनमुळे डबघाईला आलेल्या व्यावसायिकांना चिखल आणि खड्ड्यामुळे या परिसरात व्यवसाय करणे अशक्य होत असून व्यवसाय बंद करण्याची मानसिकता वाढत आहे.
- दिलीप भाडळे, व्यावसायिक

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT