suicide.jpg 
पुणे

खूप टेन्शन आलंय म्हणत 'त्याने' मारली थेट नदीतच उडी

सकाळवृत्तसेवा

किरकटवाडी (पुणे) : खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला मुठा नदी पात्रात असलेल्या पुलाजवळ एका तरुणाने दारूच्या नशेत उडी मारली असून पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तरुण वाहून गेला असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोधकार्य सुरू आहे. उत्तम नगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अभिजीत ढेरे हेही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
     

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा 

सूरज शिवाजी भातकर(वय 30, रा. येरवडा) असे पाण्यामध्ये उडी मारलेल्या तरुणाचे नाव असून दुपारी दोनच्या दरम्यान तो व त्याचा एक मित्र फिरण्यासाठी आले होते. मुठा नदीतील खडकावर बसून दोघांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर चार ते साडेचारच्या दरम्यान घरगुती वादाचे खूप टेन्शन आले आहे असे म्हणत सूरज उभा राहिला व नशेमध्ये त्याने पाण्याच्या प्रवाहामध्ये उडी घेतली. सूरज बरोबर फिरण्यासाठी आलेला त्याचा मित्र अनिल नक्ताळ यानेही सूरजला वाचविण्यासाठी पाण्यामध्ये उडी घेतली; परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सूरज पुढे वाहत गेला. फिरण्यासाठी आलेल्या इतर तरुणांनी अनिल नक्ताळ याला वाचविले. यामध्ये अनिल किरकोळ जखमी झाला आहे. मात्र, सुरजचा अजून शोध लागलेला नाही.

सध्या खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 1700 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. खडकाळ भाग असल्याने पाण्याचा वेगही जास्त आहे. अंधार झाल्याने शोधकार्यात अडथळे येत आहेत. अग्निशमन विभागाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे जवान, पोलिस निरीक्षक सुनिल पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम नगर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी व येरवडा येथील काही तरुण सूरजचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

Abu Salem Release Plea : कुख्यात गॅंगस्टर अबू सालेमला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका ! १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणात सुटका नाही; याचिका फेटाळली

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

“काजोलला कळलं तर मार पडेल…” तब्बूसोबत अजय देवगणची जवळीक पाहून चाहते म्हणाले... Viral Video

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT