पुणे

डीएसकेंच्या जामिनावर शुक्रवारी निकाल 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जागतिक मंदी, लेहमन ब्रदर्स बॅंक आदी कारणांमुळे आर्थिक संकट आले, असा बचाव बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्याकडून करण्यात आला. मात्र, ही सर्व कारणे खोटी असून, नियोजन फसल्याने डीएसके यांच्यावर आर्थिक संकट आले असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी या प्रकरणातील आरोपींच्या जामिनाला विरोध करताना केला. जामीन अर्जावर शुक्रवारी (ता. 29) निर्णय होणार आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

दीपक कुलकर्णी (डीएसके), हेमंती कुलकर्णी आणि सई वांजपे यांच्या जामिनावर; तर तन्वी कुलकर्णी, स्वरूपा कुलकर्णी, अश्विनी देशपांडे यांच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी सत्र न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. डीएसके यांनी 184 कोटी रुपये आपल्या नातेवाइकांच्या खात्यावर वळविले. प्रकल्पासाठी बॅंकेकडून कर्ज घेऊन ते पैसे इतरत्र वळविण्यात आले. डीएसके यांना आर्थिक नियोजन करता न आल्याने त्यांच्यावर कर्ज झाल्याचे अॅड. चव्हाण यांनी न्यायालयाला सांगितले. 

अजित पवार सकाळीच निघाले घरातून; कोणाला भेटणार यावर तर्कवितर्क 

या प्रकरणात गुंतवणूकदारांच्या वतीने अॅड. चंद्रकांत बिडकर यांनी न्यायालयात डीएसके यांची साक्ष नोंदवावी, असा अर्ज केला आहे. आरोपीची साक्ष नोंदविता येत नसल्याचे माहिती असतानासुद्धा अॅड. बिडकर यांनी अर्ज केला असल्याने हा न्यायालयाचा अवमान आहे. बिडकर यांना नोटीस काढण्याची मागणी अॅड. चव्हाण यांनी न्यायालयात केली. 

भाजपला मोठा झटका; जयंत पाटीलच राष्ट्रवादीचे गटनेते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT