dsk.jpg
dsk.jpg 
पुणे

डीएसकेंचे बंधू मकरंद कुलकर्णी यांना मोठा दिलासा; काय अपडेट आहेत वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

पुणे : चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ठेवी स्वीकारत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात डीएसके यांची पत्नी हेमंती मुलगा शिरीष कुलकर्णी, कुटुंबीय आणि काही नातेवाईक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मकरंद कुलकर्णी (वय 67) यांनी जामीन मिळावा याकरिता त्यांचे वकील राेहन नहार यांचेमार्फेतपुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला हाेता.

दरम्यान, याप्रकरणी दाेन्ही बाजूने युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने एक लाख रुपयांचे जातमुचलक्यावर त्यांना सर्शत जामीन मंजूर केला अाहे. ऍड. नहार यांनी युक्तिवाद करताना न्यायालयास सांगितले की,  कुलकर्णी यांच्या विराेधात प्रथमदर्शनी काेणताही सबळ पुरावा अाढळून अालेला नाही. त्यांनी काेणत्याही गुंतवणुकदाराकडून पैसे स्विकारलेले नाहीत. अार्थिक फसवणुकीत त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न हाेत नाही.

डीएसके यांच्याशी संबंधित कंपनीचे काम त्यांनी 1993 साली साेडलेले असून, संबंधित गुन्ह्याशी त्यांचा काेणत्याही प्रकारचा संबंध नाही. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जितेंद्र मुळेकर यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केलेली अाहे. 14 ऑगस्ट 2019 राेजी कुलकर्णी यांना पोलिसांनी अटक केली.

त्यानंतर तपास अधिकारी यांनी त्यांच्याविरोधात 7 नोव्हेंबर 2019 राेजी पुरवणी दाेषाराेपपत्र दाखल केले. कुलकर्णी यांनी फुरसुंगी येथील जागा शेतकऱ्यांकडून चार काेटी 87 लाख 25 हजार रुपयांना विकत घेतली. ती डीएसकेडीएल कंपनीस नऊ काेटी 29 लाख 83 हजार रुपयांना बेकायदेशीररित्या विक्री केल्याचा अाराेप पाेलिसांनी त्यांच्यावर केला अाहे. डी.  एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती यांनी अशा प्रकारे डीएसकेडीएल कंपनीच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.  

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

या आहेत जामीनाच्या अटी : 
- एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन
- साक्षीदार यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या दबाव टाकू नये
- साक्षीदारांना धमकावू नये
- तपास अधिकाऱ्यांकडे पासपोर्ट जमा करावा 
- न्यायालयाच्या परवानगीविना देशाबाहेर जाऊ नये
- कारागृहातून बाहेर आल्यानंतर प्रतिज्ञापत्रावर पत्ता कळवावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT