khed 
पुणे

शिवसेना-  राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद, पदाधिकाऱ्यांनी घातला अधिकाऱ्यास घेराव

राजेंद्र सांडभोर

राजगुरूनगर (पुणे) : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतभेदामुळे खेड पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे काम रखडल्याबद्दल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या खेड विभागाच्या उपअभियंत्यांना आज घेराव घातला. तसेच, मंजूर इमारतीच्या नियोजित जागेतच काम सुरू करण्याचा आग्रह धरून काम सुरू होण्यासाठी त्या जागेतील झाडे तोडली.

सध्याच्या खेड पंचायत समितीच्या इमारतीसमोर वाडा रस्त्याच्या पलीकडे जुन्या बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या व विश्रामगृहाच्या जागेत खेड पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे ५ कोटी रुपयांचे काम मंजूर झालेले आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदारही नेमला गेला. या कामाचे भूमिपूजन १४ सप्टेंबर २०१९ रोजी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व माजी आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते झाले होते. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि राष्ट्रवादी कांग्रेचे दिलीप मोहिते हे आमदार झाले. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा परिसर दाखविला आणि हे काम थांबवून सध्याच्या इमारतीतच नवीन आराखडा करण्यास मंजुरी देण्याची मागणी केली. त्यामुळे काम थांबले होते. 

त्यानंतर काही दिवस वाट पाहून शिवसेनेने आज आक्रमक पवित्रा घेतला. सभापती अंकुश राक्षे, उपसभापती ज्योती अरगडे, रामदास धनवटे, शिवाजी वरपे, विजया शिंदे, सुनीता सांडभोर, वैशाली जाधव, अमर कांबळे, सुरेश चव्हाण, उर्मिला सांडभोर, किरण गवारे, बाळासाहेब ताये, सुनील टाकळकर, दिलीप तापकीर आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपअभियंता एस्. बी. कानडे यांना सकाळी घेराव घातला. त्यानंतर कानडे यांनी बांधकामाला अडथळे ठरणारी झाडे तोडण्याचे रितसर परवानगीचे पत्र दिल्यावर पदाधिकाऱ्यांनी समक्ष उभे राहून झाडे तोडून घेतली. तसेच, ताबडतोब काम सुरू करण्यास सांगितले. 

Edited by : Nilesh Shende   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संताप; मुख्य गेटबाहेर दिवे लावून आंदोलन

SCROLL FOR NEXT