Due to hot summer and lockdown causes dogs to get sick 
पुणे

आधीच लॉकडाऊन त्यात कडक उन्हाळा; प्राणीमित्रांनो, कुत्र्यांकडे लक्ष द्या!

सकाळवृत्तसेवा

नवी सांगवी ( पुणे ) : कडक ऊन आणि लॉकडाऊन यासर्वांचा परिणाम पाळीव व भटक्या अशा दोन्हीही कुत्र्यांचे आजार बळाविण्यासाठी झाला आहे. मानवी शरीरावर ऋतु बदलाचा परिणाम होत असतो तसाच तो प्राण्यावरही परिणामकारक ठरतो. मार्च संपुन एप्रिलही अर्ध्यावर आल्याने उष्णतेचा आलेख उंचावत असताना कुत्र्यांना ताप येणे, त्यांच्या नाकातून रक्त येणे प्रसंगी रक्ताच्या उलट्या होणे असे आजार बळावत आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे पशुवैदयकीय डॉक्टरांची उपलब्धता त्याप्रमाणात होणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शासण व आपण रहात असलेल्या सोसायटीतील नियमांमुळे या प्राण्यांना सांभाळणे खूपच अवघड झाले आहे. 


प्राणी मित्र विनिता टंडन आणि पुनिता खन्ना यांनी पुण्यात पोलिस प्रशासनाची संपर्क साधून पाळीव प्राण्यांना केवळ त्यांच्या स्वच्छतेसाठी काही मिनिटांसाठी बाहेर पडण्याची परवानगी मिळविली. परंतु ऐरवी रस्त्याने स्वच्छंदपणे बागडणाऱ्या या श्वानांना आता व्यायामा अभावी मधुमेह, लठ्ठपणा, सांधेदुखी सारखे आजार बळाऊ लागले आहेत. सारखे सारखे घरातच राहिल्याने या कुत्रेही चिडचिड करून घरातील वस्तुंची नासधुस करू लागले आहेत. कुत्र्यांचे खाणे पेडीग्री हे प्रामुख्याने मुंबईमधून येत असते परंतु मुंबईला दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोणाचा विळखा यामुळे वाहतुक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. परिणामतः पेडीग्री मिळणेही खूपच जिकरीचे झाले आहे. 


भटक्या कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या पौर्णिमा माळी म्हणाल्या, " लॉकडाऊनमुळे पोलिसांनी ठिकठिकाणी बँरीकेटस लावले आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना जेवन देण्यासाठी मला खूपच मर्यादा आल्या आहेत. आम्ही श्वानप्रेमी कोणतीही मौजमजा न करता त्यातील वाचलेले पैसे हे या भटक्या कुत्र्यांच्या जेवन व औषधांवर खर्च करीत असतो. लॉकडाऊनचा एक चांगला परिणाम असा की आम्ही आता आमच्या पाळीव प्राण्यांबरोबर जास्त वेळ घालवू शकतो. "

पशुवैद्यकीय त्वचारोग तज्ञ डॉक्टर माधवी आवाळे म्हणाल्या, " भटक्या कुत्र्यांना गोचिड ताप वा उष्मा घात यासारखे आजार आत्ताच्या दिवसात सताऊ शकतात. अशा वेळी आपण घरात शिल्लक राहिलेली चपाती वा भात आपल्या सोसायटीच्या बाहेर या कुत्र्यांना ठेवावी. तसेच फुटलेला माठ वा एखाद्या भांड्यात स्वच्छ पाणीही ठेवले तर या कुत्र्यांचे पोषण होऊ शकेल. रेबिज हा आजार सोडला तर इतर कोणताही आजार कुत्र्यांकडून मानवाला होत नाही. " 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT