ghod
ghod 
पुणे

आंबेगाव तालुक्यात घोड नदी पुराच्या यंदा फक्त आठवणीच... 

नवनाथ भेके

निरगुडसर (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाचा पाणीसाठा गतवर्षी याच दिवशी मुसळधार पावसामुळे 95 टक्‍क्‍यांच्या पुढे गेल्याने धरणातून घोड नदीपात्रात पाणी सोडल्याने पूर आला होता. त्याउलट यंदा पावसाने दडी मारल्याने घोडनदीचे पात्र यंदा कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. 

डिंभे धरण मागील वर्षी 27 जुलै रोजी 46 टक्के भरले होते. त्यानंतर धरण क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या आठ दिवसांत धरण 50 टक्के भरले. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात अवघ्या 20 दिवसांत जवळपास 12 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यंदा पाण्याचा विसर्ग तर सोडाच धरण क्षेत्रात पाऊस पडत नसल्याने धरणातच पाणी साठत नाही. सध्या डिंभे धरण 37 टक्के भरले असून, चिंता करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

डिंभे धरणातील पाणीसाठा मागील वर्षी 5 ऑगस्ट रोजी 95 टक्‍क्‍याच्या पुढे गेल्याने डिंभे धरणातून 21 हजार क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग घोडनदी पात्रात करण्यात आला होता. त्यामुळे घोडनदीला पूर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. परंतु, यंदा पाऊस नसल्याने घोडनदीतील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, तर पुढील 12 महिने पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या पावसाचे वातावरण आहे. परंतु, पाऊस पडत नाही. सध्या जोरदार पावसाची गरज आहे. चांगल्या पावसाबरोबर डिंभे धरण भरण्यासाठी शेतकरी वर्ग पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. डिंभे धरण भरले की बळिराजाची वर्षभराची चिंता दूर होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT