Due smoking abortion Chances
Due smoking abortion Chances  sakal
पुणे

पुणे : धूम्रपानामुळे गर्भपाताची शक्यता तिप्पट

सकाळ वृत्तसेवा

पुणे : धूम्रपानामुळे कर्करोग आणि इतर गंभीर समस्यांचा धोका सर्वांनाच असतो परंतु, गर्भवती महिलांना या व्यसनाचे अधिकच जीवघेणे परिणाम भोगावे लागतात. रोग नियंत्रण केंद्राने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात धूम्रपान करणाऱ्या गरोदर महिलांच्या बाळाचा जन्माला येण्यापूर्वीच होणारा मृत्यू म्हणजेच सडन इन्फंट डेथ सिंड्रोमचे (एसआयडीएस) प्रमाण धूम्रपान न करणाऱ्या महिलांच्या बाळांपेक्षा जास्त असते, असे समोर आले आहे. ज्या बाळाच्या माता धूम्रपान करतात त्यांची सडन इन्फंट डेथ सिंड्रोमने निधन होण्याची शक्यता तिप्पट असल्याचे दिसून आले.

गर्भपात होऊ नये म्हणून महिलांनी कोणती काळजी घ्यावी आणि त्यांच्यात जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने २५ मार्च हा ‘इंटरनॅशनल अनबॉर्न चाईल्ड डे’ (गर्भातच होणारा अकाली मृत्यू) म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

धूम्रपानाद्वारे निकोटीन आणि कार्सिनोजेनिक रसायनांचे दुष्परिणाम गरोदर महिलेवर तर होतातच, मात्र वाढत्या गर्भाला अपंगत्व, हृदयदोष, मृत्यू अशा अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. गर्भवतीच्या आहारावर व सवयींवर बाळाचे पोषण होत असते. परंतु, अशा अयोग्य सवयींमुळे अकाली जन्माचा धोका अधिक वाढतो. गर्भवतीच्या धूम्रपानामुळे बाळावर गंभीर दुष्परिणाम झाल्यास गर्भपात करण्याची वेळ येते.

-डॉ. दीपाली अंबिके, बालरोग विभागप्रमुख, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय

गर्भवती होण्यापूर्वीच धूम्रपानाचे व्यसन सोडले तर उत्तमच, परंतु गरोदर राहिल्यानंतरही धूम्रपान सोडले तर त्याचा फायदा महिलेला आणि तिच्या बाळाला अवश्य होतो. या आधी गरोदरपणात धूम्रपानाचा गर्भधारणेवर काहीही परिणाम झाला नाही म्हणजे पुढील गर्भधारणा ही निरोगी होईल, असा चुकीचा गैरसमज करून काही महिला स्वतः चे आणि बाळाचे आरोग्य धोक्यात टाकतात. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी कोणीही धूम्रपान करू नये आणि त्यातले त्यात गर्भवती महिलांनी तर अशा सवयींच्या बळी पडू नये.

-डॉ. मृणाली देशपांडे, स्त्रिरोगतज्ज्ञ

धूम्रपानाचे बाळावर होणारे परिणाम...

पूर्ण मुदतीच्या गर्भधारणेनंतरही बाळ अस्वस्थ जन्माला येते.

बाळाची जन्मापूर्वी वाढ मंदावते.

बाळाच्या विकसित होणाऱ्या फुफ्फुसांवर आणि मेंदूवर दुष्परिणाम होतो

बाळाला जन्मजात दोषांचा धोका वाढतो

सिगारेटच्या धुराच्या संपर्कात आलेल्या बाळांना एसआयडीएसचा धोका

योग्य वेळेत धूम्रपान करणे थांबविल्यास...

बाळाला जास्त ऑक्सिजन मिळतो.

बाळाची वाढ चांगली होते.

बाळाचा अकाली जन्म होण्याची शक्यता कमी होते.

बाळ निरोगी जन्माला येते

जागतिक आरोग्य संघटनेनुसार अकाली जन्माचे सर्वांत जास्त प्रमाण असलेले देश आणि संख्या...

  • भारत ३,५१,९००

  • चीन १,१७,२३०

  • नायजेरिया ७,७३,६००

  • पाकिस्तान ७,४८,१००

  • इंडोनेशिया ६७,५७०

  • अमेरिका ५,१७,४००

  • बांगलादेश ४,२४,१००

  • फिलिपिन्स ३,४८,९००

  • ब्राझील २,७९,३००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का! सलामीवीर स्वस्तात बाद

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : माढा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटीलांचा भाजपा उमेदवाराला पाठिंबा

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT