arrested 
पुणे

शेतकऱ्याने अशी लढवली शक्कल, की चोरटे अलगद अडकले जाळ्यात 

राजकुमार थोरात

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्‍यातील उदमाईवाडी येथील शेतकऱ्याच्या चोरून नेलेल्या ती गाईंचा सोशल मीडियामुळे शोध लागला असून, याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. 

सोशल मीडियाचा वापर नागरिक प्रभावीपणे करीत आहेत. याचा फायदा उदमाईवाडी गावातील शेतकऱ्याला झाला. येथील तुकाराम सुखदेव फुके (वय 50) या शेतकऱ्याच्या 3 गाई चार दिवसांपूर्वी चोरट्यांनी रात्रीच्या वेळी छोट्या टेंपोमध्ये चोरून नेल्या होत्या. लॉकडाउनच्या काळामध्ये 65 हजार रुपयांच्या गाई चोरीस गेल्याने ते चिंताग्रस्त झाले. मात्र, त्यांनी गायांचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियाच वापर करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी सोशल मिडीयावर गाय चोरीला गेल्याची माहिती टाकली. त्यासाठी गाईचे वर्णनही दिले. तसेच, आसपासच्या परिसरामध्ये गाई आढळल्यास तातडीने संपर्क करण्याचे आवाहन केले. 

गावातील युवकांनाही आजूबाजूच्या परिसरामध्ये गाईचा शोध सुरू केला. सध्या लॉकडाउन असल्याने ग्रामीण भागातील प्रत्येकजण सोशल मीडियाचा मोठा वापर करत आहेत. फुके यांची सोशल मीडियावरील गाया चोरीला गेल्याची पोस्ट पाहून अनेकांनी पाहिली. त्याचप्रमाणे लासुर्णे गावातील आनंदा चव्हाण यांच्या घरासमोर रात्रीमध्ये आलेल्या गाईचा संशय काही जणांना आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे गाई चोरीचा गुन्हा उघड झाला. 

पोलिसांनी याप्रकरणी कृष्णा महादेव जाधव (वय 23, रा. लालपुरी, कळंब, ता. इंदापूर) व आनंदा राजाराम चव्हाण (वय 38, रा. लासुर्णे, ता. इंदापूर) या दोघांना अटक करून इंदापूर न्यायालमध्ये हजर केले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. याबाबतचा अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रोहिदास चौधर करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs BAN W Live: एक नंबर! २१ वर्षीय श्री चरणीने इतिहास रचला, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; बांगलादेशची दैना

Mahur Crime : माहूर येथे प्रधानमंत्री आवास योजना घोटाळाप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी, अधिकार्‍यावर गुन्हे दाखल

Delhi Crime: अल्पवयीन मुलीचं खून प्रकरण! 'तो' कॅब चालक निघाला नुपंसक, अत्याचार करण्यात अपयशी ठरल्याने केली निर्घृण हत्या

New Passport Fees: परदेश प्रवासाचे स्वप्न महागणार! केंद्र सरकारने पासपोर्ट शुल्क वाढवले; किती आणि कधीपासून नवे दर लागू होणार?

IND vs IRE : वैभव सूर्यवंशीचे भारताच्या सीनियर खेळाडूंसोबत पहिले सराव सत्र कसे राहिले? मैदानावर जाताना नेमकं काय घडले? Video

SCROLL FOR NEXT