Due to Weather special attention on Tamhini Ghat and Expressway 
पुणे

निसर्गमुळे एक्स्प्रेस वे, ताम्हिणी घाटावर विशेष लक्ष

वृत्तसंस्था

पुणे : निसर्ग वादळ वेगाने अलीबागकडे सरकत असल्यामुळे निर्माण होणारे वारे आणि मुसळधार पावसामुळे पुणे- मुंबई एक्स्प्रेस वे, जुना पुणे- मुंबई रस्ता, ताम्हिनी घाट, वरंधा घाट आदी ठिकाणी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. या भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे तसेच अनेक ठिकाणी दरड प्रवण क्षेत्र असल्यामुळे वाहतूक टाळण्याचे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे तर, रेल्वेनेही वाहतुकीत बदल केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

वादळ आणि पावसामुळे घाटात दरड कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महामार्ग पोलिसांनी अशा प्रत्येक ठिकाणी क्विक रिस्पॉन्स टिम तैनात केली आहे. तसेच राज्य रस्ते विकास महामंडळानेही (एमएसआरडीसी) पथके तैनात केली आहेत. तसेच दरड कोसळल्यास ती बाजूला करण्यासाठी पुरेशा संख्येने जेसीबी, ट्रेलर, रुग्णवाहिका आणि संबंधित मनुष्यबळ सज्ज करण्यात आले आहे, अशी माहिती महामार्ग विभागाचे पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली. एक्स्प्रेस वे वर 30 पोलिस कर्मचारी आणि अधिकारी विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. जुना- पुणे मुंबई मार्ग येथेही विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अमृतानंजन पुलाजवळ दोन किलोमीटरच्या रस्त्यावर विशेष लक्ष पोलिस आणि एमएसआरडीसीच्या पथकांनी ठेवले आहे. वाहतूक सुरू ठेवण्यात आली असली तर, नागरिकांनी आवश्यकता  असेल तरच प्रवास करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ताम्हिनी आणि वरंधा घाटातही दरडप्रवण क्षेत्रावर दोन्ही यंत्रणांनी लक्ष ठेवले आहे. 
---------
भारत-बांगलादेश सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के
---------
तिबेटमध्ये चीनचा युद्धसराव; पडद्यामागे चीन चाललंय काय?
---------
दरम्यान, रेल्वेने मुंबईहून सुटणाऱया 14 पैकी 5 गाड्यांच्या वेळात बदल केला आहे. तसेच गोरखपूर, विलासपूर, दरभंगा आदी गाड्यांचा त्यात समावेश आहे. तसेच मुंबईत पोचणाऱया 9 पैकी 2 गाड्यांच्या वेळांतही बदल कऱण्यात आला आहे. पुण्यावरून सुटणाऱया किंवा पुण्यात येणाऱया गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आलेला नाही. 

निसर्ग वादळ ताशी 120 किलोमीटर वेगाने अलिबागकडे सरकत आहे. त्यामुळे संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अलिबाग, ठाणे, पालघर, दिव-दमन आदी ठिकाणांचा त्यात समावेश आहे. या भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसेच नागरिकांनी  गरज असेल तरच घराबाहेर पडावे. इलेट्रॉनिक उपकरणे चार्ज करून ठेवावीत, पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवावा. कारण सततच्या पावसामुळे काही भागातील वीज पुरवठा खंडित होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

Viral Video: हत्तीच्या बाळाची टरबूज मागण्याची क्यूट अदा, हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मने

Thane Crime: कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ, धक्कादायक आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT