Doctor 
पुणे

MDला अॅडमिशन देतो म्हणत डॉक्‍टरला घातला ३० लाखांना गंडा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठी (एमडी) प्रवेश मिळवून देतो, अशी बतावणी करून दोघांनी हडपसर येथील एका डॉक्‍टर तरुणाला 30 लाख 10 हजारांचा ऑनलाइन गंडा घातला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सौरभ लांबतुरे (वय 26, रा. हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार संतोषकुमार आणि शामा सर ऊर्फ बाबूभाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाने एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी एका वेबसाइटवर अर्ज केला होता. अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी एकाने सौरभ यांना फोन करून एमडीला प्रवेश मिळवून देण्याची बतावणी केली. त्यानुसार डॉक्‍टर आणि संबंधित फोन करणाऱ्या व्यक्तीचे बोलणे सुरू झाले.

विविध फी आणि प्रोसेसिंगच्या नावाखाली संतोषकुमार आणि त्याचा साथीदार शामा यांनी संबंधित डॉक्‍टरकडून ऑनलाईनरित्या टप्प्याटप्प्याने 30 लाख 10 हजार रुपये बॅंकखात्यावर जमा करून घेतले. त्यानंतर फोन बंद केला. रक्कम जमा करूनही त्यांना एमडीच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळाला नाही. तसेच, आरोपींनी त्यांचे पैसे न देता फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार तपास करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक आर. आर. पाटील अधिक तपास करत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

SCROLL FOR NEXT