E-pass is no longer required for travel 
पुणे

खुशखबर ! आता प्रवासासाठी ई-पासची गरज नाही 

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर 23 मार्चपासून सुरू केलेला लॉकडाऊनमध्ये प्रवासासाठी आवश्‍यक केलेल्या ई-पास आता रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नागरीकांना जिल्हाअंतर्गत प्रवास करण्यास मुभा असणार आहे. नागरीकांना प्रवासासाठी आता पास लागणार नसल्याबाबतचा राज्य सरकारचे आदेश सोमवारी सायंकाळी पुणे पोलिसांनाही प्राप्त आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर राज्य सरकारने तत्काळ लॉकडाऊन जाहीर करीत जिल्हा व राज्यांतर्गत प्रवासाला बंदी घातली. तसेच अत्यावश्‍यक कारणासाठी प्रवास करण्याची गरज असणाऱ्या नागरीकांसाठी ई-पासची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. नागरीकांना वैद्यकीय व कुटुंबातील सदस्याचा मृत्यु या दोन कारणांसा प्रवासाला परवानगी दिली जात होती. शहरामध्ये पोलिस आयुक्तालये तर ग्रामीण भागात जिल्हाधिकारी प्रशासनामार्फत पास देण्याची सुविधा दिली जात होती. 

दरम्यान, केंद्र सरकारने काही दिवसांपुर्वीच ई-पास रद्द केल्याबाबतचा आदेश काढला होता. मात्र राज्य सरकारने राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ई-पासला रद्द करण्यास असमर्थता दर्शविली होती. परंतु नागरीकांकडूनही ई-पास रद्द करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्याची दखल घेऊन अखेर राज्य सरकारने सोमवारी नवीन नियमावली जाहीर केली. त्यानुसार, प्रवासासाठी असणारी ई-पासची अट रद्द केल्याचे जाहीर केले. मात्र प्रवास करताना काळजी घेणे आवश्‍यक आहे, त्यासाठी प्रवाशांना काही नियमांचे पालन करण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. 

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुक होणार ढोल-ताशाविना

सार्वजनिक व खासगी वाहनांना प्रवास करताना पालन करावयाचे नियम 
 - वाहनांचे प्रकार प्रवासी 
- टॅक्‍सी/कॅब अत्यावश्‍यक कारणासाठी चालकासह तिघेजण 
- रिक्षा अत्यावश्‍यक कारणासाठी चालकासह दोघेजण 
-  चारचाकी अत्यावश्‍यक कारणासाठी चालकासह तिघेजण 
 

"राज्य सरकारने अनलॉक 4 बाबतची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, एका जिल्ह्यातुन दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी आता ई-पासची गरज नाही. तसेच प्रवासासाठी अन्य कुठल्याही परवानगीची गरज लागणार नाही.''
- बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त (गुन्हे) 

वर्क फ्रॉम होममुळे वाढले मूळव्याधीचे प्रमाण; पुण्यातील सर्वेक्षणातून समोर आली माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्यात तणाव; आदित्य ठाकरे, संजय राऊत कापूरबावडी पोलिस ठाण्यात

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरचा थरार; दुचाकीला धडक देऊन चालक फरार, २१ वर्षीय तरुण ठार

Latest Marathi News Live Update : पुण्यात दोन ऑक्टोबर रोजी होणारे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

SCROLL FOR NEXT