chaskaman canal 
पुणे

पाण्यासाठी या तालुक्‍यात रंगला पूर्व व पश्चिम वाद 

भरत पचंगे

शिक्रापूर (पुणे) : लॉकडाउनचा गैरफायदा घेऊन कालवा समितीच्या बैठकीशिवाय सुरू केलेल्या चासकमानच्या "हेड टू टेल' पाणी वितरणावरून शिरूर तालुक्‍याच्या पश्चिम भागातील शिक्रापूर, पिंपळे जगताप, करंदी परिसरात पाटबंधारे खात्यावर संताप व्यक्त होत आहे. थेट शिरूर तालुक्‍याच्या पूर्व भागासाठी पाणी देण्याच्या विरोधात या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

चासकमान धरण या या वर्षी पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे चासकमान कालव्याचे उन्हाळी आवर्तन कालवा समितीच्या निर्णयानुसार होईल, असे वाटले होते. मात्र, बैठक न घेता पाटबंधारे खात्याने 13 मार्चला पाणी वितरण सुरू केले. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील शिक्रापूर परिसरातील पिंपळे जगताप, वाजेवाडी, करंदी, जातेगाव खुर्द, सणसवाडी आदी गावांमध्ये केवळ आठच दिवस पाणी सोडून थेट तालुक्‍याच्या पूर्व भागाकडे पाणी नेण्यात आले.

याबाबत पाटबंधारे खात्याने शेतकऱ्यांना माहितीही दिली नाही. "दुसऱ्या टप्प्यात पाणी देऊ,' असे सांगितले. मात्र, आता पाणी द्यायला टाळाटाळ होत असल्याची तक्रार आहे. उन्हाचा तडाखा, शेतात पिके करपत असताना काही गावांत विहिरीही आटू लागल्या आहेत. पाणी देण्याबाबत खात्याकडे लेखी नियोजन नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. पाटबंधारे खात्याच्या म्हणण्यानुसार, 92 ते 129 शाखेपर्यंतचे पाणी वितरण उरकले की, 72व्या कालवा किलोमीटरच्या शाखांना पाणी दिले जाईल. मात्र, याबाबत काहीच ठोस सांगितले जात नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. 

कालवा समितीच्या बैठकीची काहीच माहिती आम्हाला नाही. मात्र, 5 ते 10 मेपर्यंत पाणी शिक्रापूर भागाला देता येईल, असे नियोजन आहे. सध्याचे रोटेशन 45 दिवसांचे होते. ते सोमवारी (ता. 27 एप्रिल) संपले. यालाच जोडून पुढील दुसरे रोटेशन सुरू केल्याची माहिती मिळत आहे. 
- एस. के. गायकवाड
शाखा अभियंता 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT