Smart-E-Bus 
पुणे

पुणे लोहगाव विमानतळावरून या पाच मार्गांवर धावणार ई-बस

सकाळवृत्तसेवा

पुणे - लोहगाव विमानतळावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या वाहतुकीसाठी नव्या एसी ई-बस वापरण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. शहराच्या पाच मार्गांवर या बसमधून प्रवाशांना ये-जा करता येईल. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातून १४ शहरांसाठी विमान वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे लोहगाव विमानतळावरून प्रवाशांसाठी बससेवा उपलब्ध असावी, असा विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग यांचा प्रयत्न होता. त्यातून पीएमपी आणि विमानतळ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यातून विमानतळाच्या आवारात बस उभ्या करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. त्यानुसार पीएमपीची सेवा सुरू झाली आहे. विमानतळ प्रशासनाने ट्‌विट करून प्रवाशांना बस मार्गांची माहिती दिली आहे. 

सध्या पीएमपीच्या ताफ्यात १४२ ई-बस असून त्या वातानुकूलन आहेत. त्यांचा वापर प्रामुख्याने विमानतळावरून पाच मार्गांवरील वाहतुकीसाठी होणार आहे. त्यासाठी ५०, १०० आणि १५० रुपये भाडे पीएमपी प्रशासनाने प्रस्तावित केले आहे. पीएमपीच्या संचालक मंडळाने त्याला गुरुवारी मंजुरी दिल्यावर त्यानुसार भाडे आकारणी होणार आहे. नव्या ई-बसमध्ये बॅगा ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे, हे लक्षात घेऊनच त्यांचा वापर करण्याचे ठरले असल्याची माहिती पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी दिली. या बसची माहिती विमान प्रवाशांना व्हावी, यासाठी पीएमपीने काही कर्मचाऱ्यांचीही तेथे नियुक्ती केली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

आयटीसाठीही ई-बस 
माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील काही कंपन्या व खासगी क्षेत्रातील उत्पादक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी पीएमपीकडे ई-बसची मागणी केली होती. त्यामुळे विमानतळ मार्गावरील काही बस वगळून उर्वरित बस आयटी, विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा पीएमपीचा प्रस्ताव आहे. काही बस जास्त अंतर असलेल्या मार्गांसाठी राखून ठेवल्या जातील, असेही दत्तात्रेय झेंडे यांनी स्पष्ट केले.

विमानतळावरील वाहतूक वाढली 
लोहगाव विमानतळावरून २८ आणि २९ सप्टेंबर रोजी ७० विमानांची उड्डाणे झाली आहेत. त्यातून ६ हजार १७० प्रवाशांचे आगमन झाले तर, ५ हजार ४५० प्रवासी रवाना झाले आहेत. या प्रवाशांसाठी कॅब आणि रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, आता पीएमपीचीही एसी ई-बससेवा सुरू झाली आहे.

विमानतळापासूनचे असे आहेत पाच मार्ग 

  • नगर रोड, चंदननगर, मगरपट्टा, हडपसर. 
  • कल्याणीनगर, वाडिया कॉलेज, सेव्हन लव्हज चौक, स्वारगेट. 
  • पुणे स्टेशन, पुणे महापालिका, डेक्कन, कोथरूड. 
  • पुणे स्टेशन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, वाकड पूल, हिंजवडी. 
  • विश्रांतवाडी, भोसरी, पिंपरी, निगडी.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT