mla pratap saranaik farmhouse Sakal Media
पुणे

आमदार प्रताप सरनाईक यांच्या शोधासाठी 'ईडी'चे पथक लोणावळ्यात

बंगल्याची दिवसभर झाडाझडती

भाऊ म्हसाळकर

लोणावळा ः बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात चौकशी सुरु असलेल्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या शोधासाठी सक्तवसूली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने मंगळवारी (ता.१८) लोणावळ्यातील बंगल्यावर धाड टाकत झाडाझडती घेतली. सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने या केंद्रीय तपास यंत्रणांनी एकत्रित कारवाई केली असल्याची माहीती समोर आली आहे.

टाॅप सिक्युरीटीज घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आमदार प्रताप सरनाईक व त्यांच्या कुटुंबियांसह त्यांचे व्यावसायिक भागीदार यांची 'ईडी'च्या वतीने चौकशी सुरु आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ईडीने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग यांचीही चौकशीही केली होती. ईडीने टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चंडोले यांची ईडीने कसून चौकशी केली होती. त्यानंतर अमित चंडोले यांना अटकही करण्यात आली होती.

यापार्श्वभूमीवर लोणावळ्याजवळील कुणेनामा येथील डेल्ला रिसाॅर्टमधील खासगी बंगल्यात ईडी व सीबीआय चे पथक मंगळवारी सकाळी दाखल झाले. अत्यंत गोपनिय पद्धतीने हा छापा टाकण्यात आला. तपासअधिकारी व बंदोबस्तावरील अधिकाऱ्यांनी या धाडसत्राविषयी माहीती देण्यास नकार दिला. बंगल्यातून नेमके कोणते घबाड तपासयंत्रणांच्या हाती लागले याविषयी नेमकी माहीती मिळू शकली नाही. मात्र दिवसभऱ बंगल्याची झाडाझडती सुरु होती. सूत्रांच्या माहितीनुसार, आमदार प्रताप सरनाईक यांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआय आणि ईडीने ही धाड टाकल्याची चर्चा आहे. तपास यंत्रणांच्या वतीने रिसॉर्टचे सिसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT