१९१९ मध्ये एडिंग्टनने घेतलेले खग्रास सुर्यग्रहणाचे छायाचित्र.
१९१९ मध्ये एडिंग्टनने घेतलेले खग्रास सुर्यग्रहणाचे छायाचित्र. 
पुणे

एडिंग्टनच्या सापेक्षता पडताळ्याला शंभर वर्षे पूर्ण

सकाळवृत्तसेवा

पुणे - आइन्स्टाईन यांचा विशेष सापेक्षता सिद्धांत (स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी) प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे आर्थर एडिंग्टन या शास्त्रज्ञाने १९१९ मध्ये सिद्ध केला. त्याने नोंदविलेल्या निरीक्षणांमुळे सापेक्षतावादाच्या सिद्धांताला प्रत्यक्ष पुरावा मिळाला. पण, त्याचबरोबर जगाच्या वैज्ञानिक क्षितिजावर ‘अल्बर्ट आइन्स्टाईन’ या महान शास्त्रज्ञाचा उदय झाला. या महत्त्वपूर्ण घटनेची शंभरी जगभरातील खगोलशास्त्रज्ञांनी बुधवारी (ता. २९) साजरी केली.

‘जागतिक खगोलशास्त्र संघटने’तर्फे ब्राझील आणि आफ्रिकेत परिषदा आयोजित केल्या होत्या. संघटनेच्या अध्यक्षा इव्हाईन वॅन डस्कहॉईक आणि महासचिव तेरेसा लॅगो उपस्थित होत्या. पॅरिसमध्ये ‘एडिंग्टन - भौतिकशास्त्र आणि तत्त्वज्ञान’ परिषदेने आयोजित केली होती. डस्कहॉईक म्हणाल्या, ‘‘१९१९ मध्ये एडिंग्टन यांनी घेतलेल्या निरीक्षणामुळे वैज्ञानिक जगतात सकारात्मक बदल झाले. पण, त्याचबरोबर जगातील वैज्ञानिकांमध्ये सहकार्याची मोठी परंपरा उभी राहिली. अगदी परस्पर विरोधी मते असतानाही शास्त्रज्ञांनी एकत्र कामे 
केली.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT