The education department has started an online seminar program for officer 
पुणे

शिक्षण विभागाचे ऑनलाइन चर्चासत्र; दिल्लीचे शिक्षणमंत्री देणार अधिकाऱ्यांना 'धडे'

सकाळवृत्तसेवा

पुणे : शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी विचारमंथन व्हावे म्हणून शिक्षण विभागाने ऑनलाइन चर्चासत्रांचा उपक्रम सुरू केला आहे. यात अन्य राज्यातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन अधिकाऱ्यांना मिळणार आहे. उद्या (ता.16) होणाऱ्या सत्रात दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया अधिकाऱ्यांना 'धडे' देणार आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या व्यावसायिक विकासासाठी ऑनलाईन व्यावसायिक विकास मंच तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत एकूण पाच खुली सत्रे यामध्ये झाली आहेत.

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आता सहावे सत्र उद्या (ता.16) सकाळी 10.45 ते 12.15 या वेळेत होणार आहे. यात
'दिल्ली शैक्षणिक प्रयोग' या विषयावर चर्चा'दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया हे यात मार्गदर्शन करणार आहेत. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

coronavirus: पुणे शहरातील आणखी काही भागांत "कर्फ्यू' 
सर्व अधिकाऱ्यांसाठी झूम अॅपद्वारे ही सत्रे घेतली जात आहेत. सत्र ज्या दिवशी होणार आहे, त्यापूर्वी अधिकाऱ्यांना त्याची लिंक पाठविली जाते. अधिकाऱ्यांमधील कौशल्ये विकसित करण्याबरोबर राज्यातील शिक्षण व्यवस्थेची प्रगती होण्यासाठी दिशा मिळावी, या उद्देशाने ही सत्रे आयोजित केली जात आहेत.

पुणेकरांनी फ्ल्यूची लक्षणं दिसल्यास काय करायचं? ही बातमी वाचा!
परिषदेचे संचालक दिनकर पाटील म्हणाले, "शिक्षण क्षेत्राच्या भवितव्याचा विचार याद्वारे केला जातो आहे. देशा परदेशातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आम्ही अधिकाऱ्यांना मिळवून देत आहेत. त्याचे भविष्यात नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येतील. संवादातून विकास साधला जाईल."

पालकांसाठीही सत्रे
केवळ अधिकाऱ्यांपुरते मर्यादित न राहाता आम्ही पालकांसाठी देखील फेसबूक लाइव्हद्वारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करीत आहोत. यातून पालकत्व आणि लहान मुलांचे संगोपन, तसेच त्यांच्यामधील सर्जनशील वृत्तीला फुलविण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. या सत्रांपू्र्वी पालकांना त्याची वेळ व्हॉट्सअँप आणि फेसबूकच्या माध्यमातून कळविली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

SCROLL FOR NEXT