Education Minister Uday Samants letter to UGC regarding cancellation of final year students exams.jpg
Education Minister Uday Samants letter to UGC regarding cancellation of final year students exams.jpg 
पुणे

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्त्वाची बातमी; शिक्षणमंत्र्यांचे 'यूजीसी'ला पत्र

ब्रिजमोहन पाटील

पुणे : महाराष्ट्रातील 'कोरोना'ची स्थिती बघता विद्यापीठ व महाविद्यालयांमधील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा घेणे अवघड. त्यामुळे या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना ग्रेड देऊन उत्तीर्ण करण्याच्या पर्यायास विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूसीजी) मान्यता देऊन याबाबत मार्गदर्शक सूचना द्याव्यात असे पत्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचे 'यूजीसी'ला पाठवले आहे. त्यामुळे आता याबाबत 'यूजीसी' काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना'मुळे विद्यापीठ परीक्षांचे वेळपत्रक कोलमडल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आणि राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विद्यापीठांना परीक्षा घेण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील केवळ अंतीम सत्र किंवा अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा जुलै महिन्यात होणार आहे. तर इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. राज्यातील सुमारे ८ लाख विद्यार्थी जुलै महिन्यातील परीक्षेला सामोरे जाणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थी गावाकडे आहेत, त्यांना अचानक वसतीगृह सोडावे लागल्याने वह्या, पुस्तके तेथेच राहिले आहेत. ऑनलाईन अभ्यासावर मर्यादा आल्याने व नेटवर्कची समस्या असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास होऊ शकलेला नाही. अशा स्थितीत अंतीम वर्षाच्या परीक्षा देणे अवघड होणार आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. त्यामुळे परीक्षा रद्द करावी अशी मागणी केली जात होती. तसेच परीक्षेसाठी विदर्भ, मराठवाडा, कोकण , उत्तर महाराष्ट्रातून लाखो विद्यार्थी पुणे आणि मुंबई या रेझोनन्स मध्ये येणार त्यांच्या आरोग्याची, जेवणाची व्यवस्था कशी करणार, सोशल डिस्टन्सींग कसे पाळणार असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले होते. त्यामुळे पूर्वीच्या गुणांवर मूल्यमापन करून अंतीम वर्षाच्या विद्यार्थांनाही उत्तीर्ण करा अशी मागणी केली होती. 'सकाळ'नेही याबाबत वृत्त दिले होते. 
दरम्यान, मंगळवारी दुपारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत  यांनी 'यूजीसी'ला पाठवलेले पत्र ट्विटरवर टाकले. त्यामध्ये त्यांनी राज्यात 'कोरोना'चा संसर्ग वेगाने होत आहे. अशा काळात ८ ते ९ लाख विद्यार्थ्यांची घेणे अव्यवहार्य आहे. विद्यार्थ्यांच्या शारिरीक व मानसिक स्वास्थ्य याचा विचार करून अंतीम वर्षाच्या परीक्षा न घेता ही 'यूजीसी'च्या नियमानुसार ग्रेड प्रदान करण्यास मान्यता द्यावी आणि याबाबत मार्गदर्शक सूचना द्याव्यात अशी मागणी केली आहे.
पुणेकरांनो कोरोनाच्या उपचाराच्या खर्चाची चिंता सोडा; ही बातमी वाचा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापुरात आज बाईक रॅली

SCROLL FOR NEXT