education news students were taken out of the classroom for two days school fees abhinav schools pune  Sakal
पुणे

विद्यार्थ्यांना दोन दिवस काढले वर्गा बाहेर ; अभिनव विद्यालयातील प्रकार

सहा जून रोजी राज्यात शैक्षणिक वर्षाच्या घंटा किनकीनल्या आणि दुसऱ्याच दिवशी शैक्षणिक शुल्क केव्हा भरणार? शाळेचे शुल्क भरा नाहीतर वर्गाबाहेर उभे रहा...

किशोर गरड

आंबेगाव : सहा जून रोजी राज्यात शैक्षणिक वर्षाच्या घंटा किनकीनल्या आणि दुसऱ्याच दिवशी शैक्षणिक शुल्क केव्हा भरणार? शाळेचे शुल्क भरा नाहीतर वर्गाबाहेर उभे रहा असे सांगत दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर काढल्याचा लांछनास्पद प्रकार आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव विद्यालयात घडला आहे.तर शाळेच्या दुसऱ्याच दिवशी शुल्कासाठी शाळेने अजब शक्कल लढवत चक्क आपल्या पाल्याला वर्गाबाहेर काढल्याने पालक चिंतेत पडले आहेत. कोरोना महामारीनंतर विद्यार्थ्यांनी मागील वर्ष कधी ऑनलाईन कधी ऑफलाईन शिकवणीतून काढले.

त्यामुळे या वर्षीच्या पहिल्या दिवसांपासून विद्यार्थी मोठ्या उत्सहात शाळेत गेले. पहिला दिवस जातो न जातो तोच दुसऱ्या दिवशी वर्ग शिक्षकांनी शाळेची शैक्षणिक फीस न भरलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात उभे केले. इतक्यावरच वर्गशिक्षक महोदय न थांबता चक्क या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले.वर्गातून बाहेर काढल्याने विद्यार्थ्यांना खजिल होऊन बाहेर उभे राहिले.हे इतक्यावरच थांबले नाही तर दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर काढण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या हीन वागणूकीचे परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर होऊन शिक्षणाप्रती असणारी जिव्हाळ्याची भावना कमी होण्याची शक्यता असते. असे असताना शालेय संस्था पालकांना फोन करून शुल्का संदर्भात विचारू शकली असती. तसे न करता भरल्या वर्गातून विद्यार्थ्यांना बाहेर काढून शिक्षकांनी काय साध्य केले असा सवाल नागरिक करत आहेत.

संस्थांना शिक्षण प्रिय की पैसा?

आंबेगाव परिसरात मोठ्याप्रमाणात कष्टकरी कामगार वर्ग राहतो आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे या हेतूने हे पालक आपल्या पोटाला चिमटा काढून आपल्या जवळ असलेल्या विद्यालयात मुलांना शिक्षणासाठी दाखल करतात.परंतु, शुल्क भरण्यासाठी संस्था शाळेत पाऊल ठेवताच तगादा लावत असेल तर शिक्षण संस्थांना शिक्षण प्रिय आहे की पैसा यातून चित्र स्पष्ट होते आहे.

'दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढल्याची तक्रार पालकांनी माझ्याकडे केली. त्यासंदर्भात शाळेत गेलो असता, आमच्यासोबत हुज्जत घालू नका प्रचार्यांशी बोला असे सांगण्यात आले.आकरा वाजले तरी प्राचार्य शाळेत आलेले नव्हते.गावातील विद्यार्थ्यांना हीन वागणूक शाळा देत असेल तर याविरुद्ध मोठे आंदोलन उभारले जाईल.'

-युवराज वासवंड,माजी सरपंच आंबेगाव बुद्रुक

'आपल्या इथे इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग एप्रिल मध्येच सुरु होतात.इनरोलमेंट चेक करण्यासाठी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले असेल. आम्ही शुल्कासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास देत नाही. आणि जे शुल्क असेल ते दोन टप्यात भरण्याची सोय आपल्याकडे केलेली आहे.

-राजीव जगताप, संस्थापक अध्यक्ष अभिनव एज्युकेशन सोसायटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

Kitchen Hacks: हिवाळ्यात सहज सेट होईल मलाईदार दही; जाणून घ्या एकदम सोपा घरेलू उपाय

Stree Mukti Parishad : स्वातंत्र्याचा वारसा सांभाळणे काळाची गरज; धार्मिक बंधनेच महिलांवरील अत्याचारांचे मूळ: लीलाताई चितळे

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT