लाच घेताना अटक  sakal
पुणे

पुणे: गटशिक्षणाधिकाऱ्यासह दोघांना ५० हजारांची लाच घेताना अटक

आरटीईच्या यादीमध्ये नाव टाकण्यासाठी घेतले पैसे

सकाळ डिजिटल टीम

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) मिळणाऱ्या प्रवेश यादीमध्ये नाव टाकण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना हवेली पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यासह दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता.1) रंगेहात पकडले.

रामदास शिवनाथ वालझाडे (वय ५०) असे गट शिक्षणाधिकाऱ्याचे तर विकास नंदकुमार धुमाळ (वय ४०) असे पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधीचे नाव आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. हवेली पंचायत समितीच्या बाहेर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी, दोघांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

विकास धुमाळ याची हवेली पंचायत समितीकडून शालेय शिक्षण प्रवेशासाठी गठित करण्यात आलेल्या प्रवेश पडताळणी समितीचा सदस्य म्हणून पालक शिक्षक संघाचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पारदर्शक कारभारासाठी धुमाळ यांची नेमणूक करण्यात आली होती. तक्रारदार यांच्या मुलीचे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) अन्वये हडपसर येथे एका शाळेत लॉटरी पद्धतीने मिळणाऱ्या प्रवेश यादीत नाव समाविष्ट करायचे होते.

त्याकरीता कागदपत्रे तपासून ऑनलाईन मान्यता देण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. ही मान्यता देण्यासाठी धुमाळ याने गटशिक्षणाधिकारी वालझोडे यांच्यासाठी ५० हजारांची लाचेच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार ३१ ऑगस्ट रोजी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार हवेली पंचायत समीतीच्या कार्यालयाबाहेर सापळा लावण्यात आला होता. त्यावेळी धुमाळ याला लाच घेताना अटक करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक विजयमाला पवार या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Pune Hadapsar Railway: रेल्वे प्रवाशांनो, लक्ष द्या! पुणे-हडपसर मार्गावर १९ सप्टेंबरपासून मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

TET Rules: शिक्षकांसाठी मोठी अपडेट! TETच्या नियमांचा केंद्राकडून फेरआढावा; सेवेत असलेल्या शिक्षकांच्या अडचणींवरही होणार चर्चा

Beed Rain: परळी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; सिरसाळ्यात ११२ मिमी, खरिपाला आधार अन् रब्बीच्या पेरणीच्या आशा पल्लवित

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT