ghodegav 
पुणे

वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी असे सुरू आहेत प्रयत्न

चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यामध्ये निसर्गचक्री वादळामुळे खांब पडणे, तारा तुटणे आदी कारणांमुळे खेडेगावातील वस्त्यांमध्ये विजयंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विविध अडचणींना सामोरे जात वीज विभागाचे कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहायक अभियंते व जनमित्र अविश्रांत दुरूस्ती कामे करत टप्प्याटप्प्याने ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करत आहे.     

आंबेगाव तालुक्यात झालेल्या चक्रीवादळामुळे डोंगद-यांमध्ये व इतर ठिकाणी विजयंत्रणेचे नुकसान झाले आहे. विजेचे खांब व रोहित्र जमीनदोस्त झाले आहेत. वादळावेळी सावधगिरीचा उपाय म्हणून वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, वीज वितरण कंपनीचे करोडो रूपयांचे नुकसान झाले. प्रथमच इतक्या वेगाने आलेल्या वादळामुळे विजयंत्रणेची मोठी पडझड झाली. 

सद्यस्थितीत मुख्य गावांचा वीज पुरवठा पूर्ववत झाला आहे. उर्वरीत छोटी गावे, वाडयावस्त्या व पाड्यांचा विजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी दुरूस्तीची कामे वेगाने सुरू आहे. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता, सहायक अभियंते, जनमित्र व कंत्राटदारांचे कर्मचारी साधनसामग्रीसह सध्या दुरूस्ती कामे करीत आहेत. विशेष म्हणजे घोडेगाव विभागाचे उपकार्यकारी अभियंता एन. एन. घातुळे व सहायक अभियंते जनमित्रांच्या बरोबरीने काम करत आहे.     

वीज पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी ट्रॅक्टर, जेसीबी, पिकअप आदींचा वापर होत आहे. निसर्गबाधित गावांमध्ये लोखंडी व सिमेंटचे खांब, रोहित्र, वीजतारा, डिस्क व पीन इन्सुलेटर पाठविण्यात आले आहे. अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार दररोज जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये जाऊन दुरूस्ती कामात सक्रिय होऊन वीज पुरवठा पूर्ववत चालू होण्याकामी आवश्यक त्या सुचना संबंधितांना करत आहे. 

मंचर विभागाचे कार्यकारी अभियंता हेमचंद्र नारखेडे, घोडेगाव विभागाचे उपकार्यकारी अभियंता एन. एन. घातुळे, मंचर विभागाचे उपकार्यकारी अभियंता जयंत गेटमे यांच्यासह तालुक्यातील सहायक अभियंते, जनमित्र सर्व प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जाऊन युद्धपातळीवर करत असलेली दुरूस्ती कामे व मेहनत निश्चितच उल्लेखनिय आहे.    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Tragedy : चॅटजीपीटीवरून कॉपी करताना पकडला, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांची २५० कोटींची संपत्ती कुणाला मिळाली? मृत्यूनंतरही वर्षाला मिळणारे १३ कोटी कुणाच्या खात्यात जातात?

Monsoon Returns in Marathwada : मराठवाड्यात चार दिवस परतीचा पाऊस रविवारपासून हजेरी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त

SCROLL FOR NEXT