Pune_Police 
पुणे

मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई सुरुच; पोलिसांनी ८ दिवसांत...

सकाळ वृत्तसेवा

घोरपडी (पुणे) : पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची संख्याही वाढत असल्यामुळे मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर पोलिस कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसूल करत आहेत. गेल्या आठ दिवसात मुंढवा पोलिसांनी मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून साडे पाच लाख रुपये दंड वसूल केला आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे हे बंधनकारक केले आहे. परंतु या नियमाचे पुण्यातील नागरिक पालन करताना दिसत नसल्यामुळे पोलिसांकडून नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे, आणि त्यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयांचा दंड आकारला जात आहे. मुंढवा पोलिस सात ते आठ ठिकाणी नागरिकांची तपासणी करत आहेत. त्यानुसार आतापर्यंत एक हजारापेक्षा जास्त नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून साडेपाच लाख रुपये दंड वसूल केला आहे. मुंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव भोसले यांच्या नेतृत्त्वात पोलीस अधिकारी आणि पुणे महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी संयुक्तरित्या ही कारवाई करत आहेत. 

तसेच वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत आठ दिवसात आठशे लोकांवर कारवाई करत चार लाख रुपये दंड वसूल केला आहे. पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील स्वतः अधिकाऱ्यांसोबत विविध ठिकाणी कारवाई आणि मास्क घालण्याबाबत जनजागृती करत आहेत. 

या कारवाईमुळे नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लावली जात आहे. परंतु आजही अनेक नागरिक मास्क न घालता बाहेर फिरताना दिसतात. त्यामुळे त्यांना अशा कारवाईला सामोरे जावे लागत आहे. 

दंड वसूल करणे आमचा हेतू नसून नागरिकांनी मास्क घालावा आणि कोरोनाविषयी खबरदारी बाळगावी, यासाठी ही कारवाई करत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव भोसले यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IRCTC Launches E-Pantry : ‘आयआरसीटीसी’ने देशभरातील २५ रेल्वेंमध्ये ‘ई-पँट्री’ सेवा करण्याचा घेतला निर्णय!

T20 World Cup SA vs CAN: दक्षिण आफ्रिकेचा सफाईदार विजय; कॅनडाच्या नवनीतने दिली कडवी टक्कर! गुणतालिकेत मोठा बदल

Nationwide Workers Strike : देशभरातील तब्बल ३० कोटी कामगार जाणार संपावर! ; ६०० जिल्ह्यांमधील कामं ठप्प होण्याची चिन्हं

Pune News : कोल्हापूरच्या आदेशाने पुण्यातील निवडणूक बिनविरोध

Shendurwada News : शेंदूरवादा गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुसंडी

SCROLL FOR NEXT