corona 
पुणे

खेड तालुका हादरला, दिवसभरात आठ कोरोनाबाधित 

राजेंद्र सांडभोर

राजगुरुनगर (पुणे) : खेड तालुक्‍यातील वडगाव पाटोळे (ता. खेड) येथे काल (ता. 25) आढळलेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या 4 जणांचे आणि कडूसला येऊन गेलेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या 3 जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खेड तालुका हादरला आहे. 

आज सकाळी चासच्या पापळवाडी येथे मुंबईहून आलेले एक गृहस्थ कोरोनाबाधित असल्याचा अहवाल मिळाला होता. त्यामुळे खेड तालुक्‍यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आज तब्बल आठने वाढ होऊन तालुक्‍याची संख्या 15 वर पोहोचली आहे, अशी माहिती खेडचे सभापती अंकुश राक्षे आणि तालुका आरोग्य अधिकारी बी. बी. गाढवे यांनी दिली. 

कडूसमध्ये मुंबईहून येऊन पुन्हा मुंबईला गेलेला एकजण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मुंबईहून आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या कडूसमधील 6 जणांनाही काल चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांपैकी 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कडूसची चिंता वाढली आहे. तसेच, वडगाव पाटोळे येथे मुंबईहून आलेला एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल कालच मिळाला होता. त्यामुळे त्यांच्याबरोबर मुंबईहून आलेले त्यांची पत्नी, मुलगी, जावई आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या दोघांसह पाचजणांना तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यांपैकी 4 जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

मुंबईतील एक 49 वर्षीय गृहस्थ आपल्या कुटुंबासह पापळवाडी (चास) येथे राहण्यास आले. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी प्राथमिक तपासणी केल्यावर ते संशयित आढळले. त्यानंतर ते स्वतःच औंध रुग्णालयात दाखल झाले. काल रात्री त्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील आणि संपर्कात आलेल्या 9 व्यक्तींना तपासणीसाठी आज पुण्याला पाठविण्यात आले आहे. चाकणजवळच्या वाडीतील दोन व्यक्तींचा यांमध्ये समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT