An elderly woman tried to commit suicide due to By not treating them with respect 
पुणे

दिवसभर पोलिस ठाण्यात बसवलं, तक्रारही बेदखल...वैतागून ज्येष्ठ महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न

डॉ. संदेश शहा

इंदापूर : गाळपेर क्षेत्रातील ऊसतोडी बाबत पोलिसांनी सन्मानजनक वागणूक न दिल्याने तक्रारदार ज्येष्ठ महिला सुमन गणपत बाबर (वय ६०) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार सोमवार  (ता.१४) रात्री साडेसात वाजता कांदलगाव (ता.इंदापूर) येथे घडला. सुमन बाबर यांनी उपचारासाठी अकलूज (ता. माळशिरस, जि.सोलापूर) येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

सुमन बाबर यांची कांदलगाव येथे शेतजमीन असून जमीनीच्या पश्चिमेस दक्षिणोत्तर गट हा त्यांचा पुतण्या पद्माकर पांडुरंग बाबर याच्या मालकीची आहे. दोन्ही गटांच्या उत्तरेस उजनी धरणासाठी संपादित गाळपेर जमीन असून या जमिनीत ऊसाचे पीक घेऊन सुमन बाबर  माळीनगर येथील 'दि सासवड माळी शुगर फॅक्टरी'त पतीच्या नावाने ऊस घालतात. मात्र, यंदा ऊस तोड आल्यानंतर पुतण्या पद्माकर याने हरकत घेत ऊसतोड थांबवून बाबर यांच्या मुलाविरूध्द खोटी केस करण्याची धमकी दिल्याने त्यांच्या मुलाने पोलिसांकडे तक्रार केली तर सुमन बाबर यांनी ऊसतोड मनाई हुकूमासाठी इंदापूर न्यायालयात दावा दाखल केला.

सराफी व्यावसायिकाचा पिस्तुलातुन गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

पद्माकर विरोधात सुमन बाबर इंदापूर पोलीस ठाण्यात गेल्या मात्र, पोलिसांनी त्यांना दिवसभर पोलीस ठाण्यात तिष्ठत ठेवून त्यांचा अर्ज घेतला नाही. याउलट त्यांना व सुनेला पोलिस वाहनातून पोलिस ठाण्यात आणून बसवून काही वेळानंतर गावी सोडले. त्यामुळे सुमन बाबर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांचे चिरंजीव डॉ. सचिन बाबर व प्रवीण बाबर यांनी दिली. त्यामुळे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, इंदापूर पोलीस प्रमुखावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हे दाखल करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड राहुल मखरे यांनी दिला. यासंदर्भात पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांचा फोन बंद असल्याने संपर्क होवू शकला नाही.

हे ही वाचा : पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT