Earn-and-Learn-Scheme
Earn-and-Learn-Scheme 
पुणे

निवडणूक बनली ‘कमवा-शिका’ योजना

सकाळ वृत्तसेवा

विद्यार्थ्यांना रोज मिळतात पाचशे ते एक हजार रुपये
पुणे - पुणे विद्यापीठासह शहरातील महाविद्यालयांत ‘कमवा शिका’ योजनेचा पॉकेटमनी म्हणून अनेक विद्यार्थी लाभ घेतात. पण, विधानसभा निवडणुकीत विद्यार्थ्यांना पैसे कमविण्याची नामी संधी मिळाली आहे. प्रचार फेरी, कोपरा सभा, घरोघरी पत्रके वाटप करण्यासाठी त्यांना दिवसाला पाचशे ते एक हजार रुपये मिळत आहेत. तसेच प्रचार तंत्राचे धडेही मिळत आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकप्रकारे विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा शिका’ योजनाच बनली आहे.

राज्यातून पुण्यात शिकायला आलेल्या अनेकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. त्यामुळे ते ‘कमवा शिका’ योजनेतून खर्चासाठी रक्कम उभी करतात. काही जण पार्ट टाइम नोकरीही करतात. अशांना ही निवडणूक फायदेशीर ठरत आहे. 

विद्यापीठासह महाविद्यालय, क्‍लासच्या विद्यार्थ्यांना प्रचारासाठी बोलावले जात आहे. त्यासाठी त्यांना दिवसाला पाचशे ते एक हजार रुपये दिले जात आहेत. उमेदवाराच्या पदयात्रेत सहभागी होणे, सोसायट्यांमध्ये परिचय पत्रक वाटणे, अशी कामे दिली जातात. काही जण सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर काही जण दुपारपासून ते रात्रीपर्यंत प्रचारात मग्न असतात.  

तुकाराम (नाव बदललेले) हा विद्यापीठात शिक्षण घेत आहे. तो म्हणाला की, आम्हाला पैशाची गरज आहेच. प्रचाराचे काम करून पैसेही मिळत आहेत. शिवाय प्रचाराचे नियोजन कसे असते?, निवडणूक कशी लढवतात, याचा अनुभव येत आहे. 

सचिन (नाव बदललेले) म्हणाला, वेगवेगळ्या उमेदवारांचे कार्यकर्ते सकाळी लवकर येऊन भेटतात. मग, आम्ही प्रचाराला जातो. कधी पदयात्रेत सहभाग तर कधी सोसायट्यांमध्ये पत्रके वाटतो. यात आमची विचारधारा व उमेदवार कोण हे आम्ही पहात नाही. १९ तारखेपर्यंतच हा प्रचार आहे. त्यामुळे चांगले पैसे मिळत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT