Election process of 75 Gram Panchayats in the pune district started
Election process of 75 Gram Panchayats in the pune district started 
पुणे

पुणे जिल्‍ह्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया सुरु

विनायक चांदगुडे

शेटफळगढे(पुणे) : माहे जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत मुदत संपत असलेल्या ५८ व नव्याने स्थापन झालेल्या १७ अशा जिल्ह्यातील एकूण ७५ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यानुसार येत्या ८ फेब्रुवारी ते १ एप्रिल २१ पर्यंत या ७५ ग्रामपंचायतींचा निवडणूक पूर्व तयारीचा कार्यक्रम  संपन्न होणार आहे. 

Budget 2021 : "सरकारने बजेटमध्ये थापा मारू नये", संजय राऊतांनी सांगितल्या बजेटबाबतच्या अपेक्षा 

डिसेंबर २०२० अखेर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा  प्रत्यक्षात निवडणुकीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने २२ जानेवारी २०२१ च्या आदेशानुसार जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत मुदत संपत असलेल्या व नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक पूर्व तयारीला प्रत्यक्षात सुरुवात केली आहे.
यानुसार तहसीलदार यांच्या वतीने प्रत्येक गावांचे गुगल मॅप नकाशे ८ फेब्रुवारी रोजी अंतिम केले जाणार आहेत. त्यानंतर ११ फेब्रुवारी पर्यंत संबंधित तलाठी व ग्रामसेवक स्थळ पाहणी करून प्रभाग पाडून त्याच्या सीमा निश्चिती करून अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे.

त्यानंतर या प्रारूप प्रभाग रचनेस १६फेब्रुवारीला तहसीलदार यांच्या वतीने मान्यता दिली जाणार आहे. त्यानंतर गरज असल्यास २२ फेब्रुवारी २१ पर्यंत यात आवश्यकता असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. त्या दुरुस्त्याना पुन्हा २५ फेब्रुवारी पर्यंत तहसीलदार यांच्या वतीने मान्यता दिली जाणार आहे. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी प्रभाग निहाय आरक्षण काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची सूचना काढली जाणार आहे. तर ४ मार्च रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभेत प्रभाग निहाय प्रत्यक्षात आरक्षणे काढली जाणार आहेत. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती दाखल करता याव्यात यासाठी येत्या ५ मार्च २१ रोजी तहसीलदार यांच्यावतीने प्रसिद्धी दिली जाणार आहे. तर येत्या १२ मार्च २१ पर्यंत या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती दाखल करता येणार आहेत.

महत्त्वाची बातमी : इन्स्टाग्रामची मैत्री पडली महागात, मित्रानेच केली मैत्रिणीच्या घरी चोरी

प्राप्त झालेल्या हरकतीं १५ मार्च २१ पर्यंत तहसीलदार यांच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केल्या जाणार आहेत. या सर्व हरकतींवर २२ मार्च २१ पर्यंत उपविभागीय अधिकारी अधिकार्‍यांच्या वतीने सुनावणी घेतली जाणार आहे.  या सुनावणीनंतर अभिप्राय सह या हरकतींवर अंतिम निर्णयासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे .२५ मार्चपर्यंत पाठवला जाणार आहे. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी  पाठविलेल्या  प्रस्तावांची तपासणी करून येत्या ३० मार्चला जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने  या प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. त्यानंतर येत्या  १ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या या प्रभाग रचनेला प्रसिद्धी दिली जाणार आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२१ पर्यंत मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील ५८ ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे -खेड ४ , मावळ १, बारामती २, इंदापूर २ , मुळशी १, आंबेगाव १५ जुन्नर ३२, हवेली १ 

नव्याने स्थापित झालेल्या १७ ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या पुढील प्रमाणे- इंदापूर २, आंबेगाव २, जुन्नर ४, हवेली २, शिरूर ५, भोर २

सरपंच उपसरपंच निवडी ९ व १०  फेब्रुवारीला

१५ जानेवारी रोजी मतदान संपन्न झालेल्या जिल्ह्यातील ७४२  ग्रामपंचायतींचा सरपंच व उपसरपंच निवडी  येत्या ९ व १० फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहेत.  या निवडीसाठी तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी  जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या तहसीलदारांना १ फेब्रुवारीच्या  आदेशाच्या आधारे दिले आहेत

सरपंच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे खऱ्या अर्थाने गावगाड्याच्या राजकारणाला पुन्हा एकदा वेग आला आहे.  तसेच  गेल्या  दहा महिन्यापासून कोरोना मुळे व   ग्रामपंचायतीवर प्रशासक असल्यामुळे ठप्प झालेल्या विकास कामांना गती मिळण्यास ९ व १०   फेब्रुवारी च्या सरपंच निवडी संपन्न झाल्यानंतर तेथून पुढील काळात खऱ्या अर्थाने गती येणार आहे  त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Latest Marathi Live News Update: नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडून मतदान केंद्रांच्या सुरक्षेचा आढावा

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

SCROLL FOR NEXT