Devendra-Fadnavis 
पुणे

'अशा निवडणुका जिंकता येत नाहीत'; फडणवीसांचा अजित पवारांना टोला

सकाळवृत्तसेवा

पुणे - 'प्रभाग रचना बदलून निवडणूक जिंकता येत नाही,' अशा शब्दात महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी टोला लगाविला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज्य सरकार प्रभाग रचना बदलाच्या विचारात आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले उपमुख्यमंत्री पवार पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी मागील निवडणुकीत प्रभाग रचना करताना भाजपने गैरप्रकार केला असल्याचा थेट आरोप केला होता. तसेच यंदा मी आहे, काळजी करू नका, अशा शब्दात पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलासा दिला होता.

त्यावर फडणवीस यांना विचारले ते म्हणाले," यापूर्वी आघाडी सरकारच्या काळात तीन वेळा त्यांनी वॉर्ड रचना बदलली. तो सरकारचा अधिकार आहे. परंतु आम्ही सर्वांना समान संधी मिळावी, कोणावरही अन्याय होऊ नये, म्हणून चार सदस्यांचा मिळून एक प्रभाग अशी रचना केली होती. आताच्या राज्यकर्त्यांना जी काय प्रभाग रचना करायची ती करू द्या. प्रभाग रचना बदलून निवडणूक जिंकता येत नाही. भाजपच निवडणूक जिंकेल.'

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

SCROLL FOR NEXT