sinhgadh electric bus 
पुणे

पुणे | सिंहगडावर अडकलेल्या संतप्त पर्यटकांनी फोडली इलेक्ट्रिक बस

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र 1 मे 2022 पासून सिंहगड किल्यावर ये-जा करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ई-बस सुरू करण्यात आली आहे. डोणजे येथे खासगी वाहनांना पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून तेथून ई-बसची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येकी पन्नास रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आला आहे. (E- Buses on Sinhagad)

ई-बस चार्जिंग करण्यासाठी सिंहगड किल्ल्यावरील वाहन तळावर दोन चार्जिंग पॉईंट उभारण्यात आले आहेत. मात्र, या बसेस सुरू झाल्यापासून पर्यटकांचा संताप वाढतोय. अनेकदा चार्जिंगसाठी बसेस थांबतात. त्यामुळे पर्यटकांना निघण्याच्या वेळेत बस उपलब्ध नसते. अशीच घटना पुन्हा घडल्याने पर्यटकांनी संताप व्यक्त केलाय.

दरम्यान सिंहगडावर आणखी एक प्रकार समोर आला आहे. सिंहगडावर अडकलेल्या संतप्त पर्यटकांनी इलेक्ट्रिक बस फोडली. गडावरुन खाली जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र रात्री इलेक्ट्रिक बसला चार्जिंग नसल्याने बस सेवा ठप्प झाली. त्यामुळे पर्यटकांना बराच वेळ गडावर वाट पाहावी लागली.

रात्रीची वेळ असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक गडावर गेले होते. अखेर त्यांना पायपीट करत खाली याव लागलं. यातच पीएमपीएलवर काही पर्यटकांनी दगड मारला. वनविभाग आणि पीएमपीएल विभागाचा ढिसाळ कारभार यामुळे पुन्हा समोर आलाय.

आज रविवार असल्याने मोठ्याप्रमाणात पर्यटक व दुर्गप्रेमी सिंहगडावर आले होते. तब्बल नव्वद फेऱ्यांमधून सुमारे तीन हजार पेक्षा जास्त नागरिक सिंहगडावर पोहोचले होते, परंतु दुपारनंतर एकूण वीस गाड्यांपैकी बारा गाड्या चार्जिंग अभावी बंद पडल्या होत्या. पाच सीएनजी बस मागविण्यात आल्या परंतु त्यांचेही ब्रेकपॅड गरम होत असल्याने त्यांना थंड होण्यासाठी थांबावे लागत होते. तासंतास रांगेत उभे राहून संतापलेले नागरिक पीएमटीच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत होते. पीएमटीचे कर्मचारी मात्र चार्जिंग अभावी बंद पडलेल्या बसमुळे हतबल झालेले दिसत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT