Electric cremation is not working from last 6 months PMC Pune
पुणे

विद्युत दाहिनीच ‘वेटिंगवर’;सहा महिन्यांत काम नाही

गुजरातमधील ठेकेदारावर कारवाईस टाळाटाळ

सकाळ डिजिटल टीम

पुणे : ''नागरिकांचे हाल झाले तरी चालतील; परंतु ठेकेदाराला धक्का लागता कामा नये. त्यातही ठेकेदार गुजरातमधील असेल तर कारवाईही झाली नाही पाहिजे'', असाच प्रकार महापालिका प्रशासनाचा सुरू असल्याचे समोर आले आहे. शहरात तीन ठिकाणी पर्यावरणपूरक विद्युतदाहिनी बसविण्याच्या कामाची निविदा काढून ठेकेदाराला काम दिले. मात्र, मुदत उलटून गेले तरी अद्यापही काम झाले नाही. विकासकामांच्या निविदा काढताना मर्जीतील ठेकेदार नेमणे, त्यासाठी नियमांना बगल देणे आदी प्रकार महापालिकेत नवीन नाहीत. परंतु, विद्युतदाहिनी बसविण्याच्या कामातही असे प्रकार होऊ लागले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त याकडे तरी गांभीर्याने लक्ष देणार आहेत की नाही, असा प्रश्‍न विचारला जात आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये वैकुंठ, बाणेर आणि बावधन येथील स्मशानभूमीत पर्यावरणपूरक विद्युतदाहिनी बसविण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची निविदा मागविली होती. निविदा प्राप्त झाल्यानंतर हे काम देण्यात आले. त्यासाठी चार महिन्यांची मुदत होती. प्रत्यक्षात सहा महिने झाल्यानंतरही हे काम झाले नाही. बाणेर व बावधन या ठिकाणी थोडेफार साहित्य येऊन पडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदार हा गुजरातमधील असल्यामुळे पात्र नसतानाही त्याला हे काम देण्यात आले. मुदत उलटून गेल्यानंतर तरी त्या ठेकेदाराला नोटीस बजावणे, काळ्या यादीत टाकणे, दंडाची आकारणी करणे यापैकी कोणतीतरी कारवाई महापालिकेच्या विद्युत विभागाकडून होणे अपेक्षित होते. परंतु, अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.

एकीकडे कोरोनामुळे मृत्यूदर वाढला असताना नागरीकांना स्मशानभूमीत वेटींगवर थांबावे लागत आहे तर दुसरीकडे प्रशासन ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याने पुणेकरांकडून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

''सध्याच्या परिस्थितीत नागरिकांचे हित न पाहता विद्युत खात्याकडून ठेकेदाराचे हित जपले जात असेल, तर हे योग्य नाही. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कडक कारवाई केली पाहिजे.''

- महेंद्र धावडे,

अध्यक्ष, सिंहगड रोड परिसर विकास समिती

''बाणेर-बावधन येथील विद्युतदाहिनी बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. काही किरकोळ कामे राहिली आहेत, लवकरच त्या कार्यान्वित होईल. वैकुंठ स्मशानभूमीत सध्या तीन विद्युत दाहिन्या असून तेथे आणखी एक बसविल्यास नागरिकांचा विरोध होऊ शकतो. त्यामुळे नवीन जागा शोधण्याचे काम सुरू आहे.''

- श्रीनिवास कंदुल,

अभियंता, विद्युत विभाग, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT