Electricity
Electricity 
पुणे

विजेच्या तक्रारी करा ‘व्हॉट्‌सॲप’वर!

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर - दहा वेळा सांगूनही वायरमन कामासाठी उपलब्ध होत नाही, अशी काही ठिकाणी परिस्थिती असताना लोणी काळभोर (ता. हवेली) येथील वायरमनने परिसराला सुखद धक्का दिला आहे. आपल्या पाच सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार करून त्यावर तक्रारी मांडण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्या तक्रारी सोडविण्याबरोबरच ग्रुपमधील पाच वायरमन सहकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील विजेचे अपडेट्‌स ग्रुपवर टाकण्यास सुरवात केली आहे. 

अमोल तुकाराम शेलार असे या वायरमनचे नाव आहे. ते महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागीय कार्यालयांतर्गत लोणी काळभोर येथे वर्षभरापासून वायरमन म्हणून काम करतात. त्यांनी लोणी काळभोर येथील प्रधान तंत्रज्ञ बाळासाहेब सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिनाभरापूर्वी ‘विद्युत वार्ता कदमवाकवस्ती’ या नावाने व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केला आहे.

या ग्रुपमध्ये शेलार यांनी पांडुरंग खरात, अक्षय पाटील, दादा चौधरी व योगेश गिरी या चार वायरमन सहकाऱ्यांना समाविष्ट करून घेतले आहे. लोणी स्टेशन, कदमवस्ती, पठारेवस्ती, कवडीमाळवाडी व परिसरातील दोनशे पन्नास वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांना ग्रुपचे मेंबर म्हणून समाविष्ट करून घेतले आहे. शेलार व ग्रुपमधील चार सहकारी वायरमनकडून ग्रुपमधील अडीचशे नागरिकांना लोणी स्टेशन, कदमवस्ती, पठारेवस्ती, कवडीमाळवाडी व परिसरात वीज किती वेळ बंद राहणार, विजेचा पुरवठा बंद करण्याची कारणे व वीजपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती तत्काळ देण्यात येते. 

याबाबत अमोल शेलार म्हणाले, ‘‘लोणी स्टेशन परिसरात काम करताना विजेच्या समस्या किरकोळ असल्या तरी आमचे सहकारी संपर्कात नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागतो. हे आमच्या लक्षात आले. यावर उपाय म्हणून आम्ही चौघांनी आपापल्या कार्यक्षेत्रात नागरिकांच्या घरी जाऊन समस्या सोडविण्यावर भर देण्यास सुरवात केली. त्यातूनही काही प्रश्न शिल्लक राहत असल्याने, प्रधान तंत्रज्ञ सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार करण्यात आला.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT