Pune Electricity  sakal
पुणे

Pune Electricity : विजेच्या लपंडावामुळे धानोरीकर त्रस्त ; वृद्ध,लहान मुलांना होतोय त्रास

धानोरी परिसरात मागील तीन-चार दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.सध्याकडक उन्हाळा चालू असून विजेच्या लपंडावामुळे नागिरीकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

विश्रांतवाडी : धानोरी परिसरात मागील तीन-चार दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.सध्याकडक उन्हाळा चालू असून विजेच्या लपंडावामुळे नागिरीकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने परांडेनगर, धानोरी गावठाण भागातील नागरिकांना बुधवार व गुरुवारची रात्र अंधारात काढावी लागली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने असह्य उकाडा आहे.त्यामुळे नागरिकांचे विशेषतःआजारी माणसे,वयोवृद्ध, तसेच लहान मुलांचे हाल होत आहे.वीज नसल्याने सोसायटीमध्ये पाणीपुरवठा समस्या निर्माण होत आहे.

नागरिकांनी महावितरणच्या वीजदुरुस्ती व देखभाल विभागाला संपर्क केल्यावर बऱ्याच वेळा फोन लागत नाही किंवा व्यस्त येतो.चुकून फोन लागल्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांने उचलल्यास काम चालू आहे असे नेहमीचे उत्तर ऐकायला मिळत असल्याचे धानोरीतील नागरिक सांगतात.

महावितरणकडे विजेच्या तांत्रिक अडचण तपासणीसाठी आता अत्याधुनिक उपकरणे असतानादेखील गेल्या चार दिवसांत दुरुस्ती विभागाकडून काम पूर्ण का होत नाही असा प्रश्न धानोरीतील नागरिक विचारू लागले आहेत.एकंदरीत विश्रांतवाडी सबडिव्हीजन अंतर्गत येणाऱ्या धानोरी परिसराकडे महावितरणच्या वरिष्ठ अभियंत्यांनी त्वरित लक्ष घालून ही समस्या तात्काळ सोडवावी अशी मागणी धानोरी परिसरातील नागरिक करत आहेत.

धानोरी येथील रहिवासी दिलीप नारायणराव डाळीमकर म्हणाले की, "एखाद्या ग्राहकाने वीजबिल वेळेत भरले नाही तर मीटर काढण्याची कारवाई महावितरण कंपनीकडून तत्परतेने करण्यात येते.मात्र त्याच तत्परतेने वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरण ग्राहकांना सेवा देत नाही. महावितरणने धानोरीतील विजेच्या लपंडावाबाबत त्वरित लक्ष दिले नाही तर विश्रांतवाडी सबडीव्हीजन कार्यालयात धानोरीतील नागरिक तीव्र आंदोलन करतील.

यासंदर्भात येथील रहिवासी नागनाथ ढोले म्हणाले की वीज सतत खंडित होत असल्यामुळे वृद्ध व्यक्ती, लहान मुले यांना फार त्रास होतो. ते नीट झोपतही नाहीत. महावितरणला फोन केल्यास फोन उचलला जात नाही. ऑनलाईन ॲपवरून १५ वेळा तक्रार केली, तरी काही उपयोग होत नाही.

धानोरी विभागाचे महावितरणचे कनिष्ठ अभियंता जी. पी. झोपे म्हणाले की ही वीजवहिनी खूप जुनी आहे. उन्हाळ्यामुळे खूप जास्त लोड आला, तसेच खूप जास्त ऊन असल्यामुळे केबल काही ठिकाणी शॉर्ट होत होती. त्यामुळे गेले तीन चार दिवस वीजपुरवठा सतत खंडित होत होता. आता दुरुस्ती करण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भागवत कांबळे रंगेहाथ अडकले

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT