electricity sakal
पुणे

Pune News : उद्योजकांकडून चिंता; वीजदरवाढीचा ‘उद्योग’ उत्पादनांच्या मुळावर

समस्यांच्या गर्तेत असलेल्या सूक्ष्म व लघुउद्योजकांच्या अडचणीत वीजदरवाढीची पडली भर.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - समस्यांच्या गर्तेत असलेल्या सूक्ष्म व लघुउद्योजकांच्या अडचणीत वीजदरवाढीची भर पडली आहे. उद्योगाला बूस्टर मिळण्याची अपेक्षा असताना दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. विजेचे दर वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ होणार असून थेट नफ्यावर परिणाम होणार आहे.

गेल्या काही वर्षांत पुण्यात ऑटोमोबाइल क्षेत्र वाढले आहे. या क्षेत्राला आवश्यक असलेली विविध उत्पादने तयार करणाऱ्या अनेक सूक्ष्म व लघू आकाराच्या कंपन्या पुण्यात आहेत. यासह शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कंपन्या कार्यरत आहेत. त्यांना दरवाढीचा परिणाम सहन करावा लागणार आहे.

उद्योग क्षेत्र

प्रकार - सेवा क्षेत्र - उत्पादन क्षेत्र

सूक्ष्म - १,३३,७०८ - ६५,०००

लघु - २२,३९९ - ११,६७६

मध्यम - ७६२ - ७३६

मोठे - ८३२ - ०

एकूण - २,३५,११३ - (२२०० आयटी कंपन्यांसह)

एकूण रोजगार - १६,००,००० - (आयटी रोजगार ४ लाखांसह)

उद्योगांत सीएनडी, वेल्डिंगसाठी वीज मोठ्या प्रमाणात लागते. अनेक कंपन्यांत दोन किंवा तीन शिफ्टमध्ये काम चालते. परंतु आता विजेचे दर वाढल्यामुळे उत्पादन खर्चही वाढणार आहे. त्या प्रमाणात मोठ्या कंपन्या लघुउद्योगांना उत्पादनांचे दर वाढवून देत नाहीत. त्यामुळे लघुउद्योगांची परिस्थिती बिकट होणार आहे. त्यात ग्रामीण भागात लोडशेडिंग आहे.

- अशोक भगत, लघुउद्योजक

गेल्या काही वर्षांमध्ये वीज दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कमी विजेचा वापर करणाऱ्या उत्पादनांची ग्राहक मागणी करत आहे. त्यानुसार उत्पादन घेण्यावर आमचा भर आहे. आम्हाला दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे. लघुउद्योजकांच्या दृष्टीने या निर्णयाबाबत सकारात्मक भूमिका गरजेच्या आहेत. उत्पादन खर्च वाढणार आहे.

- अक्षरा मालाडकर, लघुउद्योजक

उद्योग क्षेत्रात वाढलेला खर्च उद्योजक स्वतः सहन करू शकत नाही. ज्याप्रमाणे उत्पादन खर्च वाढेल, त्याप्रमाणे उद्योजक उत्पादनांची किंमत वाढवतो. त्यामुळे ग्राहकांना मिळणारी वस्तू आता महाग होणार आहे. ही दरवाढीची झळ उद्योग क्षेत्रासह ग्राहकांनाही सोसावी लागणार आहे.

- डॉ. रवी जोशी, लघुउद्योजक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT