पुणे

वीज दरवाढीचा प्रस्ताव फेटाळण्याची मागणी

सकाळवृत्तसेवा

पुणे - महावितरणकडून वीज दरवाढीसंदर्भात सादर करण्यात आलेला प्रस्ताव पूर्णपणे अनाठायी, अवाजवी आणि सर्व ग्राहकांसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे तो फेटाळण्यात यावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाच्या वतीने वीज नियामक आयोगाकडे करण्यात आली आहे.

मंचाचे विवेक वेलणकर यांनी आयोगाकडे दाखल केलेल्या हरकतीत ही मागणी केली आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात औद्योगिक तसेच वाणिज्य ग्राहकांचे वीजदर २० टक्‍क्‍यांनी जास्त, तर घरगुती ग्राहकांसाठी (३०० युनिट्‌स मासिक वापर असणारे) दर २५ टक्‍क्‍यांनी जास्त आहेत. महाराष्ट्रात वीजदर एवढे जास्त का आहेत, याचा खुलासा महावितरणला करण्यास आयोगाने भाग पाडावे, असेही या हरकतीत म्हटले आहे.

शून्य ते शंभर युनिट्‌स वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांच्या मासिक वीजबिलात किमान २५ ते कमाल ३०० टक्‍क्‍यांनी वाढ होणार आहे, तर शंभर ते तीनशे युनिट्‌स वापरणाऱ्यांच्या वीजबिलात किमान दहा टक्के ते कमाल ३० टक्के वाढ होईल. त्यामुळे ३०० युनिट्‌स मासिक वीज वापर असणाऱ्या ग्राहकांसाठी स्थिर आकारात कोणतीही वाढ करू नये.

नेट मीटर मोफत बसविणे अपेक्षित असताना गेल्या तीन वर्षांत शहरात दहा हजारांहून अधिक ग्राहकांना हे मीटर दिलेले नाहीत. नवीन वीजपुरवठा मिळविताना ग्राहकांनाच सर्व खर्च करावा लागतो, असे असताना वीजदरवाढ ग्राहकांनी का द्यावी, असा सवालही वेलणकर यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंजाब किंग्सच्या 'डिल' वर आर अश्विन खूपच प्रभावित; म्हणतोय, हा खेळाडू IPL 2026 मध्ये घुमशान घालणार

Education News: उच्च शिक्षणात क्रांती! परदेशी शिक्षणाचा खर्च वाचणार; भारतातच जागतिक विद्यापीठांचे वर्ग भरणार

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करणाऱ्यांना वाळू माफियांकडून धमकी

Kolhapur Election : एफआरपी थकवणाऱ्यांवर कारवाई करा! राजू शेट्टींचा सरकारवर थेट हल्लाबोल

Cold wave alert: कडाक्याची थंडी वाढली, आरोग्याची घ्या काळजी! आरोग्य विभागाचे आवाहन

SCROLL FOR NEXT