पुणे - दिवाळीत वीजपुरवठा सुरळीत राहील, यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. त्याचबरोबरच प्रलंबित वीजजोड दिवाळीपूर्वी कार्यान्वित करावेत, असा आदेश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिला आहे. यामुळे दिवाळी खऱ्या अर्थाने प्रकाशोत्सव ठरणार आहे.
पुणे प्रादेशिक विभागातील अधिकाऱ्यांची नाळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यामध्ये दिवाळीत वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अभियंता व कर्मचाऱ्यांनी सज्ज राहण्याच्या सूचना त्यांनी या वेळी दिल्या.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, दिवाळीत फटाके उडविताना महावितरणच्या यंत्रणेला धक्का पोहोचू नये, याची काळजी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
वीजयंत्रणा ही सार्वजनिक ठिकाणी आहे. यात उच्च व लघुदाबाच्या उपरी वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणा उघड्यावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक वीजयंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ही घ्या काळजी...
-रोहित्र, फ्यूज पेट्या, फिडर पिलर, रिंग मेन युनिटजवळ फटाके उडवू नका
-वीज यंत्रणेजवळ कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये अथवा जाळू नका
-रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नका
-मोकळ्या जागेतच फटाके उडवा
-घरगुती विद्युत उपकरणांपासून सतर्क राहा
-रोषणाईसाठी दिव्यांची विद्युत माळ चांगल्या दर्जाची लावा
-अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करा
येथे साधा संपर्क
वीजयंत्रणेला आग लागल्यास किंवा वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या 24 तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरच्या 18001023435 किंवा 18002333435 किंवा 1912 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.