पुणे

कोरोनामुळे पुणे पालिकेच्या अकरा कर्मचाऱ्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर असा दर्जा मिळाला असला तरी अनेकांनी लस घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेच्या ११ जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील ९ जणांनी लस घेतली नव्हती. तर एक डोस घेतलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे.(Eleven employees of Pune Municipal Corporation died due to corona)

महापालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यापासून पुण्यात कोरोनाची साथ सुरू झाली. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी फ्रंटलाइन कर्मचारी असल्याने त्यांनी त्वरित लस घेणे आवश्‍यक होते; पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने महापालिकेच्या अतिरिक्‍त आयुक्‍तांनी मार्च महिन्याच्या अखेरीस कर्मचाऱ्यांसाठी तातडीने लसीकरण करून घ्यावे, अन्यथा कोरोनाबाधित झाल्यास महापालिकेकडून दिले जाणारे सर्व फायदे बंद केले जातील, असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतरही अनेक कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास टाळाटाळ केली आहे.

कोरोनाग्रस्त कर्मचारी

मार्चमधील बाधित - १२७

मृत्यू - १

मे महिन्यातील मृत्यू - १०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT