.Elgar conference to be held on January 30 in Pune said B G kolse Patil 
पुणे

पुण्यात 30 जानेवारीला एल्गार परिषद होणारच! : बी.जी. कोळसे पाटील

सकाळवृत्तसेवा

पुणे :  राज्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यात जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना देखील बंदी आहे. दरम्यान एल्गार परिषदेचे आयोजक आणि माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील यांनी पुण्यात एल्गार परिषद होणारच अशी घोषणा तर तारीखही जाहीर केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

येत्या 30 जानेवारीलाच पुण्यातील गणेश कला क्रिडा सभागृहात एल्गार परिषद घेण्यात येणार अशी माहिती बी. जी न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील यांनी दिली. दरम्यान, यापुर्वीही ३१ डिसेंबरला पुण्यात एल्गार परिषद आयोजित करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी  पुणे  पोलिसांकडे केली होती पण पुणे पोलिसांनी परिषदेची परवानगी नाकारली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा एल्गार परिषद आयोजित करण्याची मागणी उचलून धरली असून तारीख देखील जाहीर केली आहे.


जाणून घ्या केसरचे फायदे; हाडांची मजबूती, कँसरशी लढा आणि उत्तम सेक्स लाईफ देतो केसर  

दरम्यान, तीन वर्षापूर्वी डिसेंबर 2017 मध्ये पुण्यातील शनिवारवाड्यावर एल्गार परिषद झाली होती. ती पुढे वादग्रस्त ठरली होती. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2018ला कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उफाळलेला होता. या परिषदेचा संबंध पोलिसांनी त्या हिसांचाराशी जोडला होता. दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोप झाले होते. एल्गार परिषदेचा आणि कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराचा संबंध नाही असा दावा करण्यात आला होता. त्यानंतर पुढील दोन वर्ष एल्गार परिषद झाली नाही. दरम्यान आता सरकार बदलल्यानंतर पुन्हा एल्गार परिषद व्हावी, अशी मागणी कोळसे पाटील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : हमाल नेत्याच्या नातवाचा गोळ्या घालून खून; रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंडाचे कृत्य

Congress NCP Merger: काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव?, तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

Walchandnagar News : लासुर्णेच्या पृथ्वीराज मुळीक याचे सैन्यदलात भरतीचे स्वप्न साकार; लेफ्टनंटपदाच्या प्रशिक्षणासाठी झाली निवड

RBI च्या निर्णयाचा परिणाम! SBI आणि बँक ऑफ बडोदाकडून व्याजदरात वाढ; पण कोणत्या आणि किती?

गिग वर्कर्ससाठी मोठी खुशखबर! नवीन e-Shram पोर्टल झालं सुरू; २१ जूनपर्यंतच करता येणार नोंदणी, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT