naval-kishore-ram 
पुणे

पावसाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजनांवर भर - नवल किशोर राम

सकाळवृत्तसेवा

पुणे - संभाव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी पावसाळ्यापूर्वी अत्यावश्यक कामे पूर्णत्वास न्यावीत. तसेच, पावसाळ्यात कोरोनासह इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी मॉन्सूनपूर्व तयारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक पार पडली. या वेळी जिल्हाधिकारी राम यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील सर्व धरणांच्या धरण सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन करावे. जिल्ह्यातील सर्व धरणांची बांधकाम तपासणी करुन गळतीबाबत कार्यवाही करावी. नदीपात्रातील अतिक्रमणे काढावीत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेने धोकादायक पूल, जुन्या इमारती, वाड्यांच्या बांधकामांची तपासणी करावी. सर्व रस्त्यांचे पट्टे भरुन घ्यावेत. महामार्गालगत, रस्त्यालगत उत्खननामुळे बंद झालेल्या मोऱ्या कार्यान्वित कराव्यात. धोकादायक ठिकाणी प्रवेश बंद करून फलक लावावेत.

जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापनासाठी आरोग्यविषयक स्वतंत्र कक्ष स्थापन करावा. आपत्कालीन ॲम्ब्युलन्सचा टोल फ्री क्रमांक सर्व विभागांना देण्यात यावा. तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी समन्वय अधिकारी, कर्मचारी यांचे पत्ते व संपर्क क्रमांकासह जिल्हा नियंत्रण कक्षास यादी सादर करावी.

कृषी विभागाने गारपीट, अवकाळी पाऊस झाल्यास, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करुन अहवाल सादर करावा. या कामासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, यांनी समन्वय ठेवावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

Mutual Fund: स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप कोणता म्यूचुअल फंड देतो जास्त रिटर्न? आकडेवारी काय सांगते

कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा... म्हणणाऱ्या नेटकऱ्याला ऐश्वर्या नारकरांचं उत्तर; म्हणाल्या, तुमचा फोकस का...

धक्कादायक! झोमॅटोवरून बिर्याणी मागवली; अन्नात कुत्र्याचा पाय सापडला अन्... संतापजनक व्हायरल व्हिडिओ समोर

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

SCROLL FOR NEXT