Employees from four villages in Haveli taluka are banned from coming to Pune 
पुणे

हवेली तालुक्‍यातील 'या' चार गावातील कार्मचाऱ्यांना पुण्यात येण्यास बंदी 

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन हवेली तालुक्‍यातील मांजरी बुद्रुक, कदमवाकवस्ती, नऱ्हे आणि वाघोली या चार गावांमधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक, मजूर, कामगार आणि नागरिकांना येत्या शनिवारपासून (दि.6) ते दि. 12 जून पर्यंत पुणे व पिंपरी चिंचवड शहरात ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवरकर यांनी हे आदेश दिले आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
  क्लिक करा 

हवेली तालुक्‍यातील ग्रामीण भागातील करोना रुग्णांची संख्या आटोक्‍यात आणण्यासाठी त्यावर उपाययोजना करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेची बैठक नुकतीच झाली. या बैठकीस पोलिस उपविभागीय अधिकारी, हवेली तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरिक्षक, आरोग्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सर्वानुमते करोनाचे रुग्ण आढळलेल्या गावांमधील नागरिकांच्या हालचालीवर व पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीतील शासकीय कार्यालये, खासगी कंपनी अथवा व्यावसायाकरिता ये-जा करत असणाऱ्या नागरिकांवर सुध्दा काही प्रमाणात बंधणे घालणे आवश्‍यक असल्याचे म्हणणे मांडण्यात आले.
 
पावसामुळे कोरोना धुऊन जातोची ‘व्हायरल’ चर्चा; तज्ञ काय सांगतात?

या चार गावांमध्ये राहणारे ग्रामस्थ, पोलिस अधिकारी व कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी, नर्स, डॉक्‍टर्स, औषधी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी हे कामासाठी सद्यस्थितीत गावाबाहेर ये-जा करत आहेत. त्यामुळे करोना विषाणू संसर्ग वाढण्याची शक्‍यता नाकारत येत नाही. त्यामुळे या सर्व अधिकारी कर्मचारी अथवा कामगार वर्ग यांना सात दिवस त्यांचे कामाचे ठिकाणी किंवा शक्‍य नसल्यास स्वत:चे घरी सात दिवस रहावे. कामाच्या ठिकाणीच राहून काम करावे किंवा स्वतंच्या घरी विलगीकरण करून काम करावे, असे आदेश हवेलीचे उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT