The encroachment has been made on the sidewalk at Vimannagar 2.jpg 
पुणे

विमाननगर येथे पदपथावरच अतिक्रमण

सुषमा पाटील.

रामवाडी (पुणे) : विमाननगर येथे नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने महानगरपालिकेकडून लाखो रुपय खर्च करून बांधण्यात आलेल्या पदपथावर पथारी व्यवसायिकांनी खाद्य व्यवसाय सुरु केला आहे. यातच लहानमुलांसह जेष्ठ नागरिकांना स्वतःचा जीव धोक्यात घालून रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीमधून जावे लागत असल्याने त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर ठिकाणचा पदपथ लवकरात लवकर मोकळा करून द्यावा व त्यांना व्यवसाय करण्यासाठी योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी येथील रहिवासी करीत आहे.

हे ही वाचा : फुटकळ कामांवर महापालिकेची खैरात ; आर्थिक अडचणींचा विसर पडल्याने दहा कोटींच्या निविदा

कोरोनाच्या संकटाने आर्थिक बाजूंनी आधीच ग्रासलेले असे जुने नवे पथारी व्यवसायिकांनी विमाननगर येथे पदपथावर खाद्य व्यवसाय सुरु केले आहे. यामुळे खाण्यासाठी गर्दी त्या ठिकाणी होत असल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. भर वेगाने येणाऱ्या वाहनामुळे रस्त्यावरून चालताना अपघात होण्याची शक्यता नाकारू शकत नाही. तरी प्रशासनाने नागरिकांना सुरक्षितपणे चालण्यासाठी पदपथ मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांसह  स्थानिक रहिवासी करीत आहे.

पथारी व्यवसायिकांना योग्य ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी जागा देण्याबाबत अजूनही महापालिका उदासीन आहे. लोकप्रतिनिधी आपल्या परिचयांच्या लोकांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देतात पण यांचा प्रश्न अजून मार्गी लावला नाही. या पथारी व्यवसायिकांना प्रत्येक ठिकाणी काना कोपऱ्यात जागा न देता गर्दी ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे.
-  आरती सोनाग्रा, स्थानिक रहिवासी 

 ज्या ठिकाणच्या पदपथावर अतिक्रमण करण्यात आले आहे ते लवकरात लवकर हटवण्यात येईल.
- सुभाष तळेकर, अतिक्रमण निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT