manjari
manjari 
पुणे

साडेसतरानळी येथील पाटबंधारे खात्याच्या जागेवरील अतिक्रमण अखेर हटविले

कृष्णकांत कोबल

मांजरी - साडेसतरानळी येथील चौकात पाटबंधारे खात्याच्या जागेवर पत्र्याचे कुंपन घालून केलेले अतिक्रमण आज खात्याच्या मिळकत विभागाकडून पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले आहे. सहा महिन्यांपूर्वी  येथील वितरिकेसह त्याशेजारील जागेवर कुंपन घालून ती बळकाविण्याचा प्रयत्न केला जात होता. सकाळने मे महिन्यात या अतिक्रमणा बाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

साडेसतरानळी येथील मुख्य चौकातील वितरक व त्याशेजारील मोकळ्या जागेवर व्यवसायिक दृष्टिकोन ठेऊन अनेकांनी डोळा ठेवलेला आहे. त्यातच एकजणाने थेट पत्र्याचे कुंपन टाकून ही जागाच आपली असल्याचा दावा केला होता. मात्र, येथील काही जागृत नागरिक व कार्यकर्त्यांनी याबाबत पाटबंधारे खात्याकडे तक्रार करून हे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती. तसेच या मोकळ्या जागेचा उपयोग सार्वजनिक उपक्रमासाठी व्हावा, अशी सूचना मांडून कार्यकर्त्यांनी सह्यांची मोहीमही राबविली होती. 

क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल तुपे यांनी हे अतिक्रमण काढण्याबाबत गेली सहा महिन्यांपासून पाटबंधारे खात्याकडे पाठपुरावा केला होता. ते म्हणाले,"साडेसतरानळी गावच्या हद्दीत अमनोरा सिटी वसली आहे. हे गाव नुकतेच पालिकेतही समाविष्ट झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकरण आणि वर्दळही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाटबंधारे खात्याच्या येथे मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागा आहेत. यातील अनेक जागांवर या आगोदरच अतिक्रमणे झालेली आहेत. तक्रारी करुनही पाटबंधारे विभागाकडून गांभीर्याने घेतले जात नाही. उलट अनेक वेळा खात्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडूनच अतिक्रमणाला प्रोत्साहन दिले जात आहे. आज केलेल्या कारवाई प्रमाणे इतर ठिकाणीही तक्रारीची वाट न पाहता कारवाई होणे आवश्यक आहे.'

"साडेसतरानळी येथील काही नागरिकांनी या अतिक्रमणाबाबत तक्रार केली होती. कर्मचाऱ्यांकडून त्याची माहिती घेऊन संबंधीतांना अतिक्रमण काढणे बाबत नोटीसही दिली होती. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने  वरिष्ठांच्या आदेशानुसार येथील अतिक्रमण आज काढण्यात आले आहे.''
सुनील केदार 
अभियंता, पाटबंधारे विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT