murder sakal
पुणे

घरावर बांधकामाचा कचरा पडल्याने इंजिनीअरने व्यावसायिकाचा केला खुन

बिबवेवाडी येथे सोमवारी सकाळी दहा वाजता घडली घटना, आरोपी बिबवेवाडी पोलिसांकडून अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शेजारी सुरु असलेल्या बांधकामाचा कचरा (Construction waste)घरावर व गाडीवर पडल्याच्या रागातुन इलेक्‍ट्रीकल इंजिनीअरने(Electrical engineer) घर बांधणाऱ्या व्यावसायिकावर चाकूने वार करुन त्याचा खुन केला. हि घटना सोमवारी सकाळी दहा वाजता बिबवेवाडी येथील सुखसागर नगर (भाग 2) येथे घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी (Bibwewadi Police)आरोपीस अटक केली आहे.

शरद सीताराम पुरी (वय 35, रा.सुखसागर नगर, बिबेवाडी) असे खुन झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. तर सचिन विठ्ठल कपटकर (वय 46, रा. सुखसागर नगर, बिबवेवाडी) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील सुखसागर नगरमध्ये (भाग 2) पुरी व कपटकर हे दोघेही एकमेकांच्या शेजारी राहण्यास होते. पुरी यांचा छोटासा व्यावसाय होता, ते त्यांच्या कुटुंबासह तेथे राहात होते. तर पटकर हा इलेक्‍ट्रीकल इंजिनिअर आहे. दरम्यान, पुरी यांनी त्यांच्या घराचे बांधकाम सुरू केले होते. बांधकामाचा कचरा कपटकर याच्या घरावर व गाडीवर पडत असे. त्यावरुन दोघांमध्ये भांडणे झाली होती. दरम्यान, सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कपटकर याने पुरी यांच्यावर चाकूने वार केला. या हल्ल्यात पुरी गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. कपटकर यास सध्या कोणत्याही प्रकारचे काम नव्हते. मागील चार ते पाच वर्षांपासून तो बेरोजगार आहे.(Pune Crime News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT