Nihaal Singh Adarsh Google file photo
पुणे

पुण्यातील इंजिनिअरचं हटके 'टूल'; PPE किट ठेवणार 'कूल'

मी काहीतरी नवीन उपकरण तयार करण्याचा विचार करत होतो. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पीपीई किट घालावे लागते आणि त्याचा त्यांना खूप त्रास होतो, हे मी पाहिलं.

एएनआय वृत्तसंस्था

मी काहीतरी नवीन उपकरण तयार करण्याचा विचार करत होतो. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पीपीई किट घालावे लागते आणि त्याचा त्यांना खूप त्रास होतो, हे मी पाहिलं.

पुणे : पुण्यातील निहाल सिंह आदर्श (Nihaal Singh Adarsh) या इंजिनिअरिंगला शिकणाऱ्या विद्यार्थ्याने कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी एक उपकरण तयार केलं आहे. यामुळे सध्या त्याची जोरदार चर्चा होत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पीपीई किट (PPE Kit) घालावे लागते. त्यामुळे काही वेळानंतर अंगातून घामाच्या धारा येऊ लागतात. यापासून डॉक्टरांची सुटका व्हावी, यासाठी निहालने एक किट तयार केलं आहे, ज्याद्वारे पीपीई किटमधील वातावरण थंड राहील. (engineering student from Pune developed compact ventilation system for PPE kits)

मे २०२०मध्ये मुंबईच्या केजे सोमय्या इंजिनिअरिंग कॉलेजने एक प्रकल्प हाती घेतला होता. पीपीई किटमधील वातावरण थंड राहील, असे उपकरण तयार करण्याचे विद्यार्थ्यांनी ठरवले होते. हे उपकरण तयार करण्यासाठी या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांचीही मदत मिळाली. कोव्ह-टेक असं या उपकरणाचं नाव आहे.

या किटबद्दल बोलताना निहाल म्हणाला, 'मी काहीतरी नवीन उपकरण तयार करण्याचा विचार करत होतो. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पीपीई किट घालावे लागते आणि त्याचा त्यांना खूप त्रास होतो, हे मी पाहिलं. आणि यादृष्टीने उपकरण तयार करण्याचा विचार मी केला. माझी कल्पना कॉलेजमधील सर्वांना आवडली. आणि लॉकडाउनच्या काळात पुण्याहून मुंबईला येऊन या प्रकल्पावर काम करण्याची परवानगीही कॉलेजने दिली.'

एकदा वापर केल्यानंतर पीपीई किट ते फेकून दिले जाते. जर उपकरण वापरले तर पीपीई किट फेकून द्यावे लागणार नाही. तुम्ही कितीही वेळा पीपीई किट वापरू शकता. या उपकरणाची किंमत साडे चार हजार रुपये असून सहजरित्या ते पीपीई किटमध्ये बसवता येते. १०० सेकंदापेक्षा कमी वेळात हे उपकरण पीपीई किट वापरणाऱ्याला ताजी हवा प्रदान करण्यास सक्षम आहे, अशी माहिती निहालने दिली. निहालची आई पूनम कौर आदर्श यादेखील पेशाने डॉक्टर आहेत. आणि पुण्यातील आदर्श क्लिनिकमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT